
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik Agricultural Produce Market Committee) १९ जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी
माजी सभापती देविदास पिंगळे (Former Speaker Devidas Pingle) व संपतराव सकाळे, माजी संचालक दिलीपराव थेटे तसेच माजी नगरसेवक तथा माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह ७० उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामुळे निवडणूक (election) चुरशीची होणार हे स्पष्ट होऊ लागले आहे. सोमवारी (दि.३) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन, घोषणाबाजी करत अर्ज दाखल केले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला (Collector Office) जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी (Nashik Agricultural Produce Market Committee) आतापर्यंत एकूण ८५ अर्ज दाखल झाले. शुक्रवारी (दि. ३१) माजी सभापती देविदास पिंगळे आणि माजी सभापती शिवाजी चुंभळे व माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या गटातील काही इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.दोन्ही गटातील मतदार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांनी केले उमेदवारी अर्ज दाखल
माजी सभापती देविदास पिंगळे, दिलीपराव थेटे,संपतराव सकाळे, बहिरू मुळाणे, तुकाराम पेखळे,विश्वास नागरे,खांडेकर, निर्मला कड, रुपांजली माळेकर,संजय तुंगार, राजाराम धनवटे, संदीप पाटील, चंद्रकांत निकम , जगदीश अपसुंदे,युवराज कोठूळे तसेच माजी सभापती शिवाजी चुंभळे.
बाजार समिती जिल्हा बँक होऊ देऊ नका यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सभासद,शेतकरी आपल्या खंबीरपणे पाठीशी राहिले. बाजार समिती ही शेतकऱ्याच्या मालकीची संस्था आहे. ही संस्था जपण्यासाठीच आपण निवडणुक रिंगणात उतरलो आहे. नाशिक बाजार समितीला जिल्हा बँक होऊ देऊ नका.बाजार समितीत प्रशासक असल्याने शेतकऱ्यांची २ कोटीची फसवणूक झाल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संस्था वाचविण्याची गरज आहे.
- देविदास पिंगळे , माजी सभापती
भाजपा व शिवसेना शिंदे गट पॅनल भाजपाचे ज्येष्ठ नेते,मंत्री गिरिश महाजन, खा.हेमंत गोडसे ,ज्येष्ठ माजी नगरसेवक दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेन-शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सक्षम असे पॅनल राहील. सभापती असताना केलेल्या विकास कामांना सभासद पाठिंबा देतील. तोट्यात असलेली बाजार समिती नफ्यात आणून दाखवली. त्यामुळे पुन्हा एकदा मतदार कौल देतील असा विश्वास आहे.
- शिवाजी चुंभळे , माजी सभापती