...म्हणून सोमवारी नाशिक बाजार समिती बंद

...म्हणून सोमवारी नाशिक बाजार समिती बंद

पंचवटी | वार्ताहर | Panchavati

कृषी कायद्यांच्या (Agriculture Bill) विरोधात आंदोलन (Agitation) करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून वाहन गेल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना लखीमपूर खीरी येथे रविवारी (दि. ०३) घडली...

यात अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि.११) बंद ठेवण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी कुठल्याही पालेभाज्या फळभाज्या, कांदा आदी शेतमाल आणू नये, असे आवाहन सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांनी केले आहे.

उत्तर भारतातील शेतकरी (Farmers) गेली दहा महिने राज्याच्या व दिल्लीच्या सीमेवर नूतन कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलन करत आहेत. ऊन, वारा, पाऊस यांना न डगमगता सातत्याने आपला सहभाग हाजारोंच्या संख्येने घेत आहेत.

या आंदोलनाला सर्वच स्तरांतून पाठींबा मिळत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारवर (Central Government) टीका होत आहे. उत्तरप्रदेशमधील मुझफरनगर येथील महापंचायतीला दहा लाखांहून अधिक शेतकरी उपस्थित होते.

केंद्रातील एका राज्यमंत्र्याने काही गुंडांना सोबत घेऊन आंदोलकांच्या बसलेल्या लोकांवर गाडी घालून आठ शेतकरी चिरडले ही घटना निंदनीय आहे. देशभरातून या घटनेचां निषेध केला जात आहे.

याच घटनेच्या निषेधार्थ नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत बंद पाळण्यात येणार आहे. तरी शेतकरी बांधवांनी पालेभाज्या, फळभाज्या कांदा डाळिंब आदी शेतमाल आणू नये व बंदला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सभापती देविदास पिंगळे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.