सातपूर | प्रतिनिधी

महिंद्र कंपनीतील कामगार संघटनेची बहुप्रलंबीत निवडणूक येत्या शनिवारी (दि १३) होत असून शुक्रवारी सायंकाळी प्रचाराचा धुराळा थांबणार आहे. 8 जागांसाठी 73 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत...

महिंद्र कंपनीतील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने धूराळा मोठ्या प्रमाणात उडत आहे.

या आरोपांमध्ये प्रामुख्याने कामगारांना गृहीत धरून तीन वर्षांची निवडणूक सात वर्षांवर नेऊन ठेवत विद्यमान पदाधिकार्यांनी सत्तेचा गैरवापर करुन तब्बल सात वर्ष सत्तेचा उपभोग घेतला असल्याचा आरोप होत आहे.

युनियनची निवडणूक घेण्यात यावी यासाठी विद्यमान पदाधिकार्यांच्या विरोधात इच्छुक उमेदवार एन.डी जाधव, हेमंत नेहेते व पोपट देवरे याच्यासह 22 कामगारांनी एल्गार पुकारत कामगार मंत्र्यांसह जिल्हाधिकार्यांकडे तसेच न्यायालयात दाद मागितली होती.

न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणुक घेण्याचे आदेशिक झाल्यानंतर अखेर निवडणूका घेण्यासाठी मुहूर्त सापडलेला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

हेमंत नेहते यांनी प्रचारासाठी तयार केलेल्या व्हिडीओची कामगारांमध्ये चर्चा विशेष चर्चा रंंगली आहे.उमेदवार जास्त असले तरी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शनिवारी (दि. 13) मतदान घेण्यात येणार असून,या प्रक्रियेत दोन हजार मतदार सहभागी होणार आहेत. मतदानानंतर लगेचच मतमोजणी केली जाणार आहे. विद्यमान पदाधिकार्यांनी सत्तेचा गैर वापर केला आहे.

आपण कामगारांसाठी सूरू केलेले कंझूमर शॉपी,केडीकल क्लेम योजना बंद केली. 2001 साली सूरू केलेल्या स्किमला बंधने घातली.परिावाराचे प्रशिक्षण बंद केले. यामुळे कामगारांचे मोठे नुकसान झालले आहे. त्यामुळे कामगार बांधवानी आपल्याशी प्रामाणिक राहुन आपल्या प्रत्येक अडचणीत धावून येणार्या उमेदवारांना विजयी करावे.

शिरीष भावसार (माजी अध्यक्ष)

आम्ही 22 जणांनी संघर्ष उभा केल्याचा व्हिडीओ तयार करून तो कामगारांमध्ये व्हायरल केला आहे. प्रचारासाठी 2 पूर्ण वेळ दिला नसल्याने हा प्रपंच करावा लागत आहे. प्रस्थापित पदाधिकार्यांनी एक ‘नट’चेही उत्पादन वाढणार नसल्याचे सांगुन 15 टक्के काम वाढवण्याचा करार करून प्रत्यक्षात 35 टक्क्यांची अंमलबजावणी केल्याने कामगारांची फसवणूक आहे.
हेमंत नेहेते, अध्यक्षपद उमेदवार