मराठी साहित्य संमेलन यशस्वी करणाऱ्या लोकहितवादी मंडळाची कार्यकारणी जाहीर

मराठी साहित्य संमेलन यशस्वी करणाऱ्या लोकहितवादी मंडळाची कार्यकारणी जाहीर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

लोकहितवादी मंडळाच्या (Lokhitwadi Mandal) नव्या वर्षातील कार्यकारी मंडळाची (Executive body) निवड करण्यात आली आहे. यामध्ये जयप्रकाश जातेगावकर (Jayprakash Jategaonkar) यांची अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली आहे तर उपाध्यक्ष म्हणून संजय करंजकर (Deputy president sanjay karanjkar यांना नव्या कार्यकारिणीत संधी मिळाली आहे....

यासोबत नाटककार भगवान हिरे (Bhagwan Hire) हे यांची उपाध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली आहे. कार्याध्यक्ष म्हणून मुकुंद कुलकर्णी (Mukund Kulkarni) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सचिव पदासाठी सुभाष पाटील (Subhash Patil) यांना पसंती देण्यात आली. तर सहाय्यक सचिव म्हणून फणिंद्र मंडलिक (Fanindra Mandalik) यांचा नव्या कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत किरण समेळ यांचीही साहाय्यक सचिवपदी फेरनिवड झाली आहे.

कोषाध्यक्ष म्हणून चंद्रकांत दीक्षित (Chandrakant Dixit) यांची सर्वानुमते थेट निवड करण्यात आली आहे. नवनियुक्त कार्यकारणीत डॉ. शंकर बोऱ्हाडे, सुनील भुरे, मुक्ता बालिका, अपूर्वा शौचे, सी एल कुलकर्णी, सागर संत , सागर पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.

लोकहितवादी मंडळाच्या बैठकांना माजी खासदार समीर भुजबळ, प्राचार्य प्रशांत पाटील यांना निमंत्रित म्हणून बोलवावे असे यावेळी ठरविण्यात आले.

सभेला संस्थेचे विश्वस्त दिलीप साळवेकर, व्यवस्थापक अमोल जोशी उपस्थित होते. भविष्यात लोकहितवादी मंडळाचे कार्यालय व्हावे तसेच मराठी भाषा भवन यासाठी लोकहितवादी मंडळाने प्रयत्न करावे असे साळवेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. नवनिर्वाचित कार्यकारणीचे अभिनंदन करून सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com