नाशिकमधील लॉकडाऊन पूर्णपणे उठणार नाही; जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणतात...

नाशिकमधील लॉकडाऊन पूर्णपणे उठणार नाही; जिल्हाधिकारी सुरज मांढरे म्हणतात...

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन उद्या रात्री बारा वाजेपर्यंत आहे. १२ मे पासून सुरु असलेले कडक लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याबाबत काल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संकेत दिले आहेत. मात्र पूर्णपणे लॉकडाऊन संपले असा अर्थ नसून राज्याने घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे जे नियम आपण आजपर्यंत पाळले आहेत तसेच नियम पाळावे लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली...

ते म्हणाले, नाशिक शहर व जिल्ह्यातील रुग्ण संख्या विचारात घेता आपण दिनांक 12 मे पासून काही निर्बंध कठोर केले होते. त्यानंतर रुग्ण संख्या चांगल्यापैकी नियंत्रणात आलेली आहे.

त्यामुळे आपण स्थानिक स्तरावर कठोर केलेले निर्बंध दिनांक 23 मे रात्री बारा वाजल्यापासून शिथिल करत आहोत. परंतु याचा अर्थ लॉक डाऊन पूर्ण उठला आहे असे नाही.

आपल्या जिल्ह्यात जे निर्बंध दिनांक 12 मे पूर्वी राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार लागू होते ते निर्बंध तसेच पुढे चालू राहणार आहेत व त्याआधी सूचनेची प्रभावी अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर केली जाणार आहे.

त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातून पूर्ण लॉक डाऊन उठला आहे अशा गैरसमजात कोणी राहू नये. सर्वांनी पूर्वीच्या सर्व निर्बंधांचे यथोचित पालन करावे.

मोठ्या प्रयत्नांनी रुग्ण संख्या कमी केली आहे. परंतु, आता पुन्हा निर्बंधांचे उल्लंघन केल्यास ती वाढायला वेळ लागणार नाही याची जाणीव ठेवून सर्वांनी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com