नाशिक लॉकडाऊन : पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी सकाळपासून लागल्या रांगा

नाशिक लॉकडाऊन : पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी सकाळपासून लागल्या रांगा

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात येत्या बुधवार (दि १२) दुपारी बारा वाजेपासून २३ मे २०२१ च्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सोमवारी लॉकडाऊन जाहीर होताच मंगळवारी नाशिककर सकाळी ७ वाजेपासून खरेदीसाठी बाहेर पडले. किराणा दुकाने, भाजी मार्केट आणि पेट्रोलपंपांवर रांगाच रांगा लागल्या. खरंतर लॉकडाऊनमध्ये बाहेरच पडावे लागणार नसल्यामुळे भरमसाठ पेट्रोल भरण्याची गरज नाही. परंतु वाहनधारक टाकीच फुल्ल करत आहे.

नाशिकमधील लॉकडाऊन काळात पेट्रोल पंप सुरु राहणार आहे. परंतु पेट्रोल पंपांवर केवळ परवानगी दिलेल्या वाहनांच पेट्रोल वितरित करण्यात येणार आहे. वाहतूक, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, परवानगी पास असलेली वाहने यांच्यांकरीता पेट्रोल-डिझेलची उपलब्धता कंपनीचे अधिकारी व उपप्रादेशीक परिवहन अधिकारी करुन देणार आहेत. यामुळे नाशिक शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या. अनेक वाहन चालक टाकी फुल्ल करुन द्या सांगत होते. कोणत्याही वाहनासांठी पेट्रोल, डिझेल भरण्याची काहीच मर्यादा नसल्यामुळे पेट्रोल पंपचालक हवे तितके पेट्रोल-डिझेल वाहन धारकांना देत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com