Video : नाशिकमधील लॉकडाऊन शिथिल; काय सुरु काय बंद? पाहा इथे

नाशिककरांना दिलासा : विकेण्ड लाॅकडाऊन मात्र कायम
Video : नाशिकमधील लॉकडाऊन शिथिल; काय सुरु काय बंद? पाहा इथे

नाशिक | प्रतिनिधी

करोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा आलेख खालावल्याने नाशिक जिल्ह्याला रेड झोनमधून वगळण्यात आले असून आजपासून (दि.१) लाॅकडाउनमध्ये शिथिलता देण्याच्या निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला आहे. त्यानूसार अत्यावश्यक सेवेची दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. उद्योगधंदे अटिशर्तींसह सुरु करता येईल. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शेती साहित्याची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरु ठेवता येईल. एकूणच लाॅकडाऊन शिथील केल्यामुळे अर्थचक्राला गती येणार असली तरी सावधगिरी म्हणून वीकेण्ड लाॅकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे...

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी (दि.३१) पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत लाॅकडाऊन शिथिलतेचा निर्णय घेण्यात आला. राज्यशासनाने जारी केलेल्या लाॅकडाऊनचे सकारात्मक परिणाम जिल्ह्यात पहायला मिळत आहे. पाॅझिटिव्हिटी रेट दहा टक्क्यांच्या खाली आला असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे.

ऑक्सिजन कमतरता दूर झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९२ टक्के इतके आहे. हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात येत असून दुसर्‍या लाटेचा धोका कमी झाल्याने नाशिकला रेड झोनमधून वगळण्यात आले आहे.

त्यामुळे पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नाशिककरांना दिलासा देत लाॅकडाऊन शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा देणार्‍या दुकानांची वेळोमर्यादा वाढविण्यात आली आहे.

उद्योगधंदे देखील सुरु होणार आहे. मात्र निर्बंध शिथील करताना दुपारी ३ ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली असून विनाकारण बाहेर पडल्यास ५ हजाराचा दंड आकारला जाणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता दर शनिवार व रविवार लाॅकडाऊन कायम राहणार आहे.

हे राहणार सुरु

- अत्यावश्यक दुकाने व आस्थापना सकाळी ७ ते दुपारी २ सुरु

- औद्योगिक अस्थापना अटी शर्तीच्या अधीन राहून सुरु

- कृषी उत्पन्न बाजार समिती

- भाजीपाला विक्री सकाळी ७ ते दुपारी २

- स्वस्त रेशन धान्याची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ सुरु

- शिवभोजन थाळी केंद्र सकाळी १० ते दुपारी १२ सुरु

- कृषी सामान दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ सुरु

-अत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० व्यक्ती व नंतरच्या विधीसाठी १५ व्यक्तींची उपस्थिती

- शैक्षणिक वहया पुस्तके व स्टेशनरी दुकाने, हार्डवेअर गॅरेजेस व घर दुरुस्तीचे साहित्य, इलेक्ट्रीकल्स् साहित्य दुकाने ई - कॉमर्स पध्दतीने विक्री चालू

- शासकीय कार्यालयामध्ये २५ % उपस्थिती

- हॉटेल्स , फुड स्टॉल्स , मिठाई , बेकरी , तसेच पाळीव प्राण्यांचे जिवनावश्यक वस्तूंची दुकाने , अन्न पदार्थाची विक्रीचे दुकाने , महामार्ग व इतर रस्ते लगतची सर्व ढाबे व हॉटेल्स आणि मद्य विषयक सर्व आस्थापना केवळ होम डिलिव्हरी व पार्सल सुविधेसाठी सकाळी ७ ते दुपारी १ व सायंकाळी ५ ते रात्री ८या वेळेत सुरु

- मद्य विक्री विषयक सर्व दुकाने शासनाने ठरवून दिलेल्या दिवशीच सुरु

-हॉटेल्स , फुड स्टॉल्स , अन्न पदार्थाची विक्रीचे दुकानांन मधून फक्त पार्सल व होम डिलिव्हरी सुविधा सुरु

- बँका , पतसंस्था व पोस्ट ऑफिसचे नियमित कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहील . मुद्रांक व नोंदणी विभागाचे अंतर्गत दस्त नोंदणीचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहील . पेट्रोल व डिझेल , स्वंयपाकाचे गॅस संबंधित सर्व कामे नेमुन दिलेल्या वेळेत सुरु ठेवण्यास मुभा राहील .

- सर्व सार्वजनिक , खाजगी बस वाहतूक , रिक्षा , चारचाकी व दुचाकी वाहने नागरिकांना परवानगी दिलेल्या कामासाठी अनुज्ञेय राहील

- अत्यावश्यक वैद्यकीय कारणाकरीता व इतर परवानगी दिलेल्या बाबींकरीता जिल्हयातंर्गत व जिल्हयाबाहेर प्रवास करावयाचा असल्यास www.covid19.mhpolice.in या वेबसाईट वरुन ई - पास प्राप्त करुन प्रवास करता येईल

हे राहणार बंद

-स्वागत समारंभ , लग्न व अनुषंगिक कार्यक्रम , हॉल , मंगल कार्यालय , लॉन्स व तत्सम ठिकाणे बंद राहतील

- पाच व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह नोंदणी कार्यालयात विवाह नोंदणी करता येईल

- चित्रपट गृहे , व्यायाम शाळा , जलतरण तलाव , करमणूक केंद्र , नाट्यगृह , कलाकेंद्रे , प्रेक्षक गृहे व सभागृहे, सार्वजनिक व खाजगी क्रीडांगणे , मोकळ्या जागा , पाक , उद्याने व बगीचे पुर्णत : बंद

- शाळा , कॉलेजेस , कोचिग क्लासेस बंद राहतील. पूर्वीप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने सुरु राहतील

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com