नाशिक-कोल्हापूर बससेवेला प्रारंभ

एसटीच्या जिल्हा, राज्यांतर्गत ७५० फेऱ्या सुरू
नाशिक-कोल्हापूर बससेवेला प्रारंभ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

लॉकडाऊनमुळे एसटीच्या सेवेला ब्रेक लावण्यात आला होता. मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्याने एसटीच्या वतीने लांब पल्ल्याच्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सध्याच्या घडीला 750 बसेस धावत आहेत. सोमवारपासून नाशिक-कोल्हापूर बससेवेला प्रारंभ झाला आहे. कोल्हापूर शहरातील कोरोनाची ट्क्केवारी कमी झाल्याने एसटी महामंडळाने तेथेही बसेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे...

एसटी महामंडळाने नाशिक-नागपूर, नाशिक-हिंगोली, नाशिक-अमरावती या शहाराच्या बससेवा सुरू करून त्या दरम्यान बसेसच्या फेर्‍या देखील वाढविण्यात आल्या आहेत.

नाशिक जिल्हाअंतर्गत आणि राज्यांतर्गत दि.७ जूनपासून एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. एसटी महामंडळाकडून टप्प्याटप्याने बसेस सुरू केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच नाशिक-लातूर, ठाणे, औरंगाबाद्, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर आदींसह अनेक मार्गावर बस धावत आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यामुळे एसटी महामंडळाची सेवा ठप्प झाली होती. मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्याने एसटी महामंडळाला प्रवासी वाहतुकीस परवागनी देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर आंतर जिल्हा प्रवासी वाहतुकीबरोबरच लांब पल्ल्यांच्या मार्गावरदेखील बसेस सुरु करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. त्यादृष्टीने विभागातून नाशिक-कोल्हापूर, नाशिक- नागपूर तसेच नाशिक लातूर मार्गावर बसेस सुर करण्यात आल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या मार्गावरील बसेसला मिळणार्‍या प्रतिसादानंतर इतरही मार्गावर बसेस सुरु करण्यात येत असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान नाशिक विभागात एकूण ८०० हून अधिक बसेसची संख्या आहे.

त्यातील ३६० बसेस प्रत्यक्षात धावत आहेत. दिवसाला ७५० फेऱ्या होत असल्याचे एसटीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील आठवड्यात एसटीला दीड कोटींचा महसूल मिळाला आहे.

प्रवाशांचा चांगला प्रतिसाद बससेवेला मिळत आहे. पुढील काही दिवसात महसुलात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com