ओझे-करंजवण परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा; वीजप्रश्न मार्गी

ओझे-करंजवण परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा; वीजप्रश्न मार्गी

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील ओझे परिसरामध्ये महावितरण कंपनीकडून सुमारे ३१ लाखाचे दुरुस्तीचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले. या दुरुस्तीमुळे ओझे, नळवाडी परिसरात वांरवार खंडीत होणारा विजपुरवठा सुरळीत झाला असून शेतकरी वर्गाने सुटकेचा श्वास सोडला. विजेचा नेहमीचा ताण मिटणार असल्याने बळीराज्याने समाधान व्यक्त केले.

सविस्तर माहिती अशी की, ओझे परिसरातील विजेचे काम पन्नास वर्ष जुने झाल्यांमुळे वारंवार तारा गरम होऊन तुटत असल्यामुळे या परिसरामध्ये कायमच विजेची बत्ती गुल होत होती.

दिवसातून दोन-दोन वेळा या जीर्ण झालेल्या तारा तुटत असे त्याप्रमाणे लखमापूर उपकेंद्रापासून ओझे परिसर या सात कि. मी अंतरावर असल्यामुळे वायरमनला तांत्रिक बिघाड शोधणे अवघड होऊन बसले होते.

त्यामुळे करंजवण येथील महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सांगळे यांनी वरिष्ठ पातळीवरील अधिकारी वर्गाशी चर्चा करून लखमापूर उपकेंद्रापासून ते ओझे व नळवाडी परिसराचा काही भाग या सात किमी अंतराच्या विजेच्या दुरुस्तीचे सुमारे ३१ लाखाचे काम मंजूर करून घेतले होते. हे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

या दुरुस्तीमध्ये सात किमीच्या जुन्या झालेल्या संपूर्ण तारा बदलणे त्याप्रमाणे जीर्ण झालेले सडलेले व गजलेले ३५ पोल नविन टाकणे, ५ एबीस्विच नविन टाकणे, तिरपे झालेले ५० पोल सरळ करणे, जूने झालेले क्रॉसआर्म व टॉप फिटींग ४२ ठिकाणी बदलणे या शिवाय अनेक ठिकाणी शेतात अडचणीच्या ठिकाणी असलेले पोल दुस-या ठिकाणी उभे करणे आशा प्रकारची छोटी मोठी सर्व कामे पूर्ण केल्यांमुळे ओझे कृषी फिडर संपूर्णपणे नविन करण्यात आले आहे.

ओझे परिसरासाठी लखमापूर उपकेंदातून दोन स्वतंत्र्य फिडरची निर्मिती करण्यात आली आहे त्यांत गावासाठी गावठाण तर कृषीपंपासाठी कृषी फिडर अशी विभागणी करण्यात आली आहे या सर्व दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता डोंगरे ,उपकार्यकारी अभियंता राऊत, अधिक्षक अभियंता दरोली सहाय्यक अभियंता सांगळे आदीनी मोलाचे सहकार्य केले आहे.

नविन कामामुळे वारंवार जो तांत्रिक बिघाड होत होता तो आता होणार नसून कमी दाबाने होणारा वीजविज पुरवठा आता जास्त दाबाने होत आहे. ओझे कृषी फिडरची संपूर्ण दुरुस्ती करण्यात आली असून आता कृषीपंपसह ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा होत आहे.

संदिप सांगळे, सहाय्यक अभियंता करंजवण

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com