नाशिक ही निर्यातदार घडवणारी राज्यातील मोठी भूमी: पांचाळ

निर्यात व्यवस्थापक अभ्यासक्रमला सुरुवात
नाशिक ही निर्यातदार घडवणारी राज्यातील मोठी भूमी: पांचाळ

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

आयमाच्या (AIMA) पुढाकाराने सुरू झालेला निर्यात व्यवस्थापक अभ्यासक्रमामुळे (Export Manager Courses) निर्यातदार (exporter) घडविणारी नाशिक (nashik) ही राज्यातील मोठी ठरेल, असा विश्वास आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ (AIMA President Nikhil Panchal) यांनी व्यक्त केला.

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (AMBAD INDUSTRIES AND MANUFACTURERS ASSOCIATION) (आयमा) आणि सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट (Symbiosis Institute of Operations Management) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्‍या एक्स्पोर्ट मॅनेजर प्रोग्रॅम (Export Manager Program) अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचच्या शुभारंभप्रसंगी पांचाळ बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आयमा सरचिटणीस ललित बूब, सिम्बॉयसिसच्या डीन वंदना सोनवणे, आयमाच्या निर्यात समिती अध्यक्ष हर्षद ब्राह्मणकर,उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सहसचिव योगिता आहेर, देवेंद्र राणे, जगदीश पाटील, कुंदन डरंगे, रत्ना पळुरी, मनिषा बोरसे आदी होते.

चार महिन्यांचा हा अनोखा अभ्यासक्रम असून पहिल्या टप्प्यात 25 उद्योजकांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांत 200 जणांना या कार्यक्रमांतर्गत सामावून घेण्यात येईल, असे सिम्बॉयसिसच्या डीन वंदना सोनवणे भाषणात म्हणाल्या. दर दर 15 दिवसांनी रविवारच्या दिवशी हा वर्ग घेण्यात येईल. पहिल्या बॅचच्या उद्योजकांची (entrepreneurs) यावेळी उपस्थितांना ओळख करून देण्यात आली.

कांदा (onion) आणि द्राक्षांची (grapes) मोठ्याप्रमाणात निर्यात (export) करून नाशिकने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. वाईन उद्योगातही (wine industry) आपण आघाडीवर आहोत. नाशकातून अन्य उत्पादनांचीही मोठ्या प्रमाणात निर्यात होते आणि आता निर्यातदारांना ज्ञान या प्रशिक्षणातून मिळणार असल्याचे पांचाळ यांनी सांगितले. नाशकातून (nashik) मोठ्याप्रमाणात निर्यातदार घडविणे तसेच निर्यातीसाठी आवश्यक असलेली कौशल्ये,

कोणत्या वस्तूंची कोणत्या देशात निर्यात करावी, त्याबाबत येणार्‍या अडचणी, कायदेशीर बाबी याचे सखोल ज्ञान जिल्ह्यातील उद्योजकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयमा सरचिटणीस ललित बूब यांनी सांगितले. आयमाच्या निर्यात विषयक समितीचे चेअरमन ब्राह्मणकर यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उपयुक्ततेची माहिती दिली. यावेळी प्रशिक्षणार्थी व उद्योजक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com