Video : नाशिक तिसऱ्या टप्प्यात; सर्व दुकाने ४ वाजेपर्यंत राहणार सुरु, पाहा सविस्तर

Video : नाशिक तिसऱ्या टप्प्यात; सर्व दुकाने ४ वाजेपर्यंत राहणार सुरु, पाहा सविस्तर

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. संपूर्णपणे निर्बंध नाशिकमध्ये हटविण्यात आले नसले तरी बऱ्याच प्रमाणात नाशिक आता अनलॉक होणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज जिल्हयाचा ऑनलाईन आढावा घेतला यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी लवकरच याबाबतचे सविस्तर आदेश काढणार असल्याचेही भुजबळ म्हणाले.

राज्यात कोविड रुग्णांची परिस्थिती वेगवेगळी आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्हिटी दर आणि ‘रुग्ण असलेले’ ऑक्सिजन बेड यांची संख्या वेगवेगळी असून येत्या सोमवारपासून निर्बंध उठविण्याची प्रक्रिया सुरू करताना याच निकषांवर विविध पाच स्तरांमध्ये निर्बंध उठवण्यास संबंधी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.

नाशिक जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर विकेंड लॉकडाऊनदेखील रद्द करण्यात आले आहे. लग्नसमारंभ ५० नातलगांच्या उपस्थितीत करता येणार आहे. तर क्रीडांगणे, पटांगणे, उद्याने सुरु होणार आहेत.

नाशिकसाठी अशी आहे नियमावली

 • आवश्यक वस्तूंच्या दुकान/ आस्थापना यांच्या साठी वेळ : रोज ४:०० वाजे पर्यंत

 • आवश्यक नसलेल्या वस्तूंच्या दुकान/ अस्थापना यांच्या साठी वेळ : आठवडाभर ४:०० वाजे पर्यंत

 • मॉल/ चित्रपटगृह (एकल स्क्रीन असलेले मल्टीप्लेक्स) /नाट्यगृह : बंद

 • उपहारगृह : क्षमतेच्या ५० टक्के/ आठवडयाच्या दिवसी. जेवणासाठी ४:०० वाजे पर्यंत. त्यानंतर फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरी

 • लोकल ट्रेन : वैदकीय, आवश्यक, महिला,यांच्या साठी चालू. डी एम ए अतिरिक्त निर्बंध लागू करू शकतात

 • सार्वजनिक ठिकाण,पटांगण, वॉकिंग, सायकलिंग : रोज सकाळी ५:०० ते ९:०० वाजेपर्यंत

 • खाजगी कार्यालय उघडण्याबाबत : सर्व .केवळ आठवड्याच्या दिवसी संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत. अपवादात्मक श्रेणी वगळून

 • कार्यालयात उपस्थिती शासकीय कार्यालय सहित (खासगी- जर मुभा असेल) : ५० टक्के

 • क्रीडा : ऑउट डोर सकाळी ५:०० ते ९:०० संध्याकाळी ६:०० ते ९:००.

 • नेमबाजी : (बबल) संध्याकाळी ५:०० नंतर मुभा नाही

 • लोकांची उपस्थिती (सामाजिक/सांस्कृतिक/ मनोरंजन) : क्षमतेच्या ५० टक्के फक्त आठवड्याच्या दिवसी. शनिवारी, रविवारी मनाई

 • लग्न समारंभ : ५० लोक

 • अंत्यसंस्कार : २० जन

 • बैठका/ निवडणुका/ स्थानिक प्रशासन स्थायी समिती बैठक. सहकारी मंडळ. : क्षमतेच्या ५० टक्के

 • बांधकाम : फक्त त्या ठिकाणी राहणारे मजूर/ किंवा मजुरांना ४:०० वाजेपर्यंत मुभा

 • जमाव बंदी/ संचारबंदी : संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत जमाव बंदी. ५:०० नंतर संचारबंदी

 • जिम, सलून,सौंदर्य केंद्र, स्पा/ वेलनेस केंद्र:संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत, क्षमतेच्या ५० टक्के. आगाऊ परवानगीसह, एसी ची परवानगी नाही.

 • सार्वजनिक वाहतूक : १०० टक्के. उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही

 • माल वाहतूक,( कमाल तीन व्यक्ती/ चालक/ क्लीनर/सहायक व इतर.)यात्रीसाठीच्या सर्व अटी लागु असतील. : नियमित

 • अंतर जिल्हा प्रवास/खाजगी कार/टेक्सी/बस/ लांब पल्ल्याच्या रेलगाड्या : नियमित -जर स्तर ५ च्या अश्या ठिकाणी थांबणार नसेल की जेथे ई पास आवश्यक आहे.

 • उत्पादन. निर्यात करणाऱ्या कंपन्या ज्यांना माल निर्यात करायचा आहे. - नियमित

 • उत्पादन _ नियमित

 • १-आवश्यक उत्पादन कंपन्या (आवश्यक माल/कच्चा माल/ आवश्यक मालासाठी पाकेजिंग उत्पादन) २-निरंतन उप्तादन करणाऱ्या कंपन्या.(ज्या उत्पादनगृहात उत्पादन लगेच थांबवणे शक्य नाही. ३-राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण साठी आवश्यक उत्पादने. ४-डाटा केद्र/क्लौड सेवा प्रदाते/आय टी सेवा - नियमित

 • उत्पादन : अश्या सर्व उत्पादन केंद्र की ज्यांचा आवश्यक, निरंतर किंवा निर्यात उत्पादनात समावेश नाही. - ५० टक्के कर्मचार्यांसह/ वाहतूक बबल मध्ये ये-जा.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com