
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकून सरकारकडून प्रकल्प बाधित शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली...
समृद्धी महामार्गावर सकाळी अकरा वाजेपासून परिसरातील शेतकरी जमा झाले. पोलीस यंत्रणेकडून खबरदारीचा उपाय म्हणून दंगा नियंत्रक पथकाच्या दोन तुकड्या आंदोलन स्थळी तैनात करण्यात आल्या. वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे, सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुटे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलन स्थळी दाखल झाले.
पोलीस प्रशासनाकडून आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समक्ष भेट घडून देण्याची हमी दिली. रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार कोळी, उपअभियंता निंबादास बोरसे यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या समस्यांची शासन पातळीवर पाठपुरावा करून सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर वावीचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे हे स्वतः आंदोलक डॉक्टर विजय शिंदे, दुशिंग वाडीचे सरपंच कानिफनाथ घोटेकर, कहांडळ वाडीचे उपसरपंच दत्तात्रय पवार, नितीन आत्रे, भास्कर कहांडळ यांना शासकीय पोलीस वाहनातून घेऊन शिर्डीकडे रवाना झाले आहेत.