Photo Gallery : लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी संपूर्ण नाशिक रस्त्यावर

संसर्ग वाढण्याची भीती; दुकानांमध्ये खरेदीसाठी रांगाच रांगा
Photo Gallery : लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी संपूर्ण नाशिक रस्त्यावर

नाशिक | प्रतिनिधी

कडक लॉकडाऊनला उद्या दुपारी बारा वाजेपासून अंमलबजावणी होणार आहे. यापार्श्वभूमीवर नाशिकच्या कानाकोपरयातून हजारो नाशिककरांनी कुटुंबियांसह खरेदीसाठी मोठी गर्दी शहराच्या मध्यवर्ती भागात केली. एकीकडे वाढलेली गर्दी आणि दुसरीकडे महापालिकेच्या वतीने सुरु असलेली रस्त्यांची कामे आणि बंद असलेली सिग्नल यंत्रणा यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी शहराच्या चौफेर दिसून आली...

आज सकाळपासुन खरेदीसाठी नाशिककर रस्त्यावर उतरले. दहा दिवसाची पूर्वतयारी म्हणून आज सर्वच बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.

दुकानांसाठी अकरा वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरातील नागरीक एकाच वेळी खरेदीसाठी बाहेर पडले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक बाहेर पडल्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात असून परिणामी पुढील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे.

नाशिक शहराच्या प्रत्येक चौकात आज सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. रविवार पेठ, दहीपूल, सिडको, पेठ रोड, दिंडोरी रोड, शालीमार परिसर आदी मुख्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे.

मार्केट परिसरात मोठी गर्दी

पेठ रोड आणि दिंडोरी रोड परिसरात भाजीपाला मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी नाशिककरांनी केली होती. दुसरीकडे, सिग्नल यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी याठिकाणी दिसून आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com