Video : येवल्याच्या पतंगोत्सवात पालकमंत्री छगन भुजबळांनी दिली ढील

Video : येवल्याच्या पतंगोत्सवात पालकमंत्री छगन भुजबळांनी दिली ढील

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात मोठ्या उत्साहात पंतग उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा या उत्सवाची रंगत कमी असली तरीदेखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पतंगोत्सवाचा आनंद घेत ढील दिली. याप्रसंगी मी कुणाचीही पतंग काटत नसल्याचे भुजबळ यांनी सांगत विरोधकांना टोला हाणला...

करोनाचे सावट असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थित पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पतंग उत्सवाचा आनंद घेतला. यावेळी उत्सव साजरा करत असतांना नागरिकांनी करोनाबाबत अधिक काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मोहन शेलार,वसंत पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, सचिन कळमकर इ. उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com