Nashik Grampanchayat Election Result : 'या' ग्रामपंचायतींचे उमेदवार आघाडीवर

Nashik Grampanchayat Election Result :    'या' ग्रामपंचायतींचे उमेदवार आघाडीवर

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील (Nashik District) १४ तालुक्यांतील १९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यात ८ ग्रामपंचायतीत सरपंच व सदस्य आधीच बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर १८८ ग्रामपंचायतींसाठी ७९.६३ टक्के मतदान झाले होते...

यानंतर रिंगणात असलेल्या ३ हजार ४७४ उमेदवारांचा आज फैसला होत असून सकाळपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, महिरावणी, नांदूर शिंगोटे, दाभाडी, वडाळीभोई, उमराळे, डांगसौंदाणे यासह अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत.

जिल्ह्यातील नाशिक तालुक्यातील महिरावणीच्या सरपंचपदी कचरू वागळे विजयी झाल्याचे समजते असून अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. तर बेलगांव ढगा ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे उमेदवार शरद मांडे आघाडीवर असल्याचे समजते. तर पिंपळगाव बसवंतमध्ये सरपंचपदाचे उमेदवार सतीश मोरे तिसऱ्या फेरी अखेर आघाडीवर आहेत. याशिवाय देवळ्यात १३ पैकी ९ जागांवर भाजपचे वर्चस्व असल्याचे समजते. तर येवला आणि नांदगावमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com