नाशिक पदवीधर निवडणूक : मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

नाशिक पदवीधर निवडणूक : मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे ३० जानेवारी २०२३ रोजी मद्यविक्री करण्यास मनाई तथा कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे...

याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२३ रोजी आदेश पारित केले आहेत. यादिवशी मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक असणार आहे.

नाशिक पदवीधर निवडणूक : मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई
कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

पदवीधर मतदारांना आपले नाव शोधणे होणार सुलभ

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना कोणत्या मतदान केंद्रात आपले नाव आहे, याची माहिती शोधण्यासाठी निवडणूक आयोगाने एक लिंक तयार केली असून, ही लिंक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या पाचही जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

नाशिक पदवीधर निवडणूक : मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई
भुसावळमध्ये भूकंपाचे धक्के, परिसरात भीतीचे वातावरण

तदारांना त्यांचे नाव कोणत्या मतदान केंद्रास जोडलेले आहे याबाबत शोध घेणे सुलभ होण्यासाठी मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी https://ceoelection.maharashtra.gov.in/gtsearch/ ही लिंक दिली आहे. सदर लिंक विभागातील पाचही जिल्ह्याच्या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर (Homepage) प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांनी कळविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com