नाशिक ते घोटी रस्त्याची दुर्दशा; आंदोलनाचा इशारा

नाशिक ते घोटी रस्त्याची दुर्दशा; आंदोलनाचा इशारा

नाशिक । Nashik

मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक ते घोटी रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

या प्रश्नाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल नाका प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे अन्यथा शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजीम सय्यद यांनी दिला आहे.

या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक वेळा वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात घडले असल्याचे वाहतूक सेनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे विल्होळी जवळील उड्डाणपुलाचे काम केवळ दोन महिन्यातच खराब झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

या उड्डाणपुलावर दिशादर्शक व रिफ्लेक्टर देखील अद्याप लावण्यात आले नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दिलेल्या सूचनांचे पालन वाहनधारकांकडून केले जाते.

मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोलनाका प्रशासन यांच्याकडून वाहनधारकांना पुरेशी सवलत मिळत नसल्याची तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com