नाशिक । Nashik

कृषी कायद्यांविरोधात गेली महिनाभरापासून दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिक किसान सभेचे सदस्य शेतकरी उद्या (दि.2) दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहिती किसान सभेचे राजु देसले यांनी दिली.

2 जानेवारी सकाळी 11 वा नाशिक गोल्फ क्लब मैदान येथून वाहन जथा किसान सभेचा दिल्लीकडे निघणार आहे, या प्रसंगी नाशिक शहरातील परिवर्तन वादी पक्ष, संघटना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या शेतकरी जथ्थ्याचे नेतृत्व किसान सभा राज्य सचिव राजु देसले करणार आहे. या प्रसंगी जेष्ठ नेते प्रकाश रेड्डी भाकप नेते उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा. प्रस्तावित वीज बिल विधेयक रद्द करा. यासह इतर मागण्यासाठी दिल्ली येथे सुरू असलेले आंदोलनात लढणार्या अन्नदाता शेतकर्यांना साथ देण्यासाठी किसान सभेचे कार्यकर्ते नाशिक वरुन उदया निघणार आहे, तसेच पुढे पिंपळगाव बं., चांदवड येथे या शेतकरी जथ्थेचे स्वागत होणार आहे.

तसेच धुळे येथे सभा होऊन रात्री अमरावती मोजरी येथे मुक्काम करून सकाळी जथा हा जथ्था नागपूर येथे 3 जानेवारी ला 2 वा पोहचेल तिथे अखिल भारतीय किसान सभा राष्ट्रीय महासचिव अतुल कुमार अंजान यांची जाहीर सभा होईल कॉम्रेड तुकाराम भस्मे, भाकप राज्य सचिव, नामदेव गावडे किसान सभा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस, श्याम काळे आयटक सरचिटणीस, सि एन देशमुख आयटक राज्य अद्यक्ष, आदी शेतकरी कामगार परिवर्तन वादी पक्ष संघटना शुभेच्छा देण्यासाठी संविधान चौकात येणार आहेत.

नागपूर येथे महाराष्ट्र तिल सर्व जिल्यातील जथा एकत्रित येऊन दिल्ली कडे रवाना होईल. मराठवाडा मधील आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांचे विधवा महिला ही दिल्ली आंदोलन मध्ये येथून दिल्लीकडे 3 जानेवारीला निघणार आहे.

या शेतकरी जथ्थात काँ.राजु देसले कार्यध्यक्ष किसान सभा, काँ. प्रकाश रेड्डी किसान सभा नेते, किसान सभा जिल्हा अध्यक्ष भास्करराव शिंदे, सरचिटणीस देविदास भोपळे , जिल्हा संघटक विजय दराडे, काँ.सुकदेव केदारे, अँड.दत्तात्रय गांगुर्डे, नामदेव बोराडे, मधुकर मुठाळ, प्रा के एन अहिरे, जगन माळी, विठोबा घुले यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे.