‘नाएसाे’ च्या अध्यक्षपदी प्रा. रहाळकर; कार्यवाहपदी प्रा. निकम बिनविराेध

‘नाएसाे’ च्या अध्यक्षपदी प्रा. रहाळकर; कार्यवाहपदी प्रा. निकम बिनविराेध

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक एज्युकेशन सोसायटी या संस्थेची यंदा निवडणूक न होताच सर्वच पदाधिकारी आणि सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रा. सूर्यकांत रहाळकर यांची फेरनिवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी प्रा. दिलीप फडके आणि चंद्रशेखर मोंढेही बिनविरोध निवडले गेले आहेत...

"संस्थेच्या आगामी तीन वर्षांकरिता म्हणजेच २०२१ ते २०२३ नुकतीच निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यावेळी सर्वच पदाधिकारी बिनविरोध निवडले गेले.

यात कार्यवाह म्हणून प्रा. राजेंद्र निकम यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. तसेच कार्यकारी मंडळाच्या आठ सदस्यांमध्ये विनायक देशपांडे, मोहन रानडे, चंद्रशेखर वाड, भास्कर कोठावदे, जयदीप वैशंपायन, सरोजिनी तारापूरकर, सचिन महाजन आणि पांडुरंग अकोलकर यांची ही बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

नाशिक एज्युकेशन सोसायटीची शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू असून २०२३ हे शतक महोत्सवी वर्ष आहे. नूतन कार्यकारिणीला या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्याची संधी देखील मिळणार आहे.

निवडणुका म्हटल्या की मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढते तसेच बऱ्याचदा कटूता देखील निर्माण होते. मात्र, सभासदांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांना संधी देऊन त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. त्यामुळे जुनेच पदाधिकारी पुन्हा कार्यरत राहणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com