इंडियन आयकॉन अवॉर्डने डॉ नमिता कोहोक सन्मानित

इंडियन आयकॉन अवॉर्डने डॉ नमिता कोहोक सन्मानित

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या डॉ. नमिता परीतोष कोहोक यांना इंडियन आयकॉन अवॉर्ड 2021 पुरस्काराने सन्मानिक करण्यात आले. Motivational Speaker of year 2021 ने नवी दिल्लीत एका अलिशान सोहळ्यात कोहोक यांना या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अरुणाचल प्रदेशचे खेळ व पर्यावरण मंत्री मामा नातूनग यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला...

नॅशनल ह्यूमन राईट्स व निती आयोग या संस्थांनी या पुरस्काराचे आयोजन केले होते. तब्बल सहाशेहून अधिक सन्वमान र जगभरात व्याख्याने डॉ. कोहोक यांची झाली आहेत. लाखो लोकांना त्यांच्या जीवन प्रवासामुळे प्रेरणा मिळाली आहे. सर्वच वयोगटातील व्यक्ती त्यांचे चाहते आहेत. इंग्लिश, मराठी व हिंदी भाषेत त्या व्याख्याने देतात. 'सोनेरी मुकुटाचा काटेरी प्रवास' हे त्यांचे मराठीतील व्याख्यानाच शीर्षक आहे.

अ जर्नी फ्रॉम कॅन्सर टू क्रावून वर त्या नियमित बोलतात. कॅन्सरशी त्यांचा लढा, हा जीवन प्रवासावर बोलतात. करोनाच्या दुसऱ्या लाटेत जे पेशंट होम quarantine होते अशा 2 हजार 600 रुग्णांना त्यांनी समुपदेशन केले होते. कोहोक यांना आतापर्यंत 59 पुरस्कारांनी सन्मानित कऱण्यात आले आहे. कॅन्सर पेशंटसचे समुपदेशन, गरजू कॅन्सरच्या पेशंट्सना मदत, सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग असतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com