तुर्त नाशिकला वैद्यकिय महाविद्यालय नाही

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची माहिती
तुर्त नाशिकला वैद्यकिय महाविद्यालय नाही

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik Road

जिल्ह्यात सद्या एक वैद्यकीय महाविद्यालय (Medical College) आहे. त्यामुळे येथे तूर्त शासकीय महाविद्यालयाला परवानगी देणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या जिल्ह्याला पुन्हा दुसर्‍या महाविद्यालयासाठी परवानगी देता येत नाही. त्यासाठी काही नियमावली ठरवलेली असते. अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी दिली.

नाशिक रोड (Nashik Road) येथील प्रभाग क्रमांक 20 मध्ये केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते वीविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा (Dedication ceremony) पार पडला. याप्रसंगी आमदार राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale), शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पवार पुढे म्हणाल्या की, प्रभाग 20 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह महिलांसाठी ग्रीन जिम हेल्थ सेंटर (Green Gym Health Center) उभारले आहे.

येथील भाजपच्या (BJP) नगरसेवकांनी सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी केलेले काम उत्तम असल्याचे त्यांनी म्हटले. नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मागील अनेक दिवसांपासून प्रभागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासाठी आम्ही सर्व सदस्य प्रयत्नशील होतो. आज खर्‍या अर्थाने त्याचे लोकार्पण झाल्याचे त्यांनी म्हटले.

कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक संभाजी मोरुस्कर, नगरसेविका संगीता गायकवाड ,नगरसेविका सीमा ताजने, नगरसेवक अंबादास पगारे यांनी केले. याप्रसंगी विजया कंक्रेज, प्रभा पारगावकर ,आसावरी मरकळ, शुभदा बोर्डस, मेगा पिंपळे, अलका मिरजकर, तेजा पारुंडेकर, पुष्पा गावंडे , नीता कुलकर्णी ,प्रतिभा कुंभकर्ण, आदी उपस्थित होते.

जिल्ह्याला वैद्यकीय पीजी महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच याबाबत ठोस निर्णय होईल. त्याचप्रमाणे शिंदे टोल नाका बंद करण्याबाबत नामदार नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासोबत चर्चा झाली आहे. याविषयी हो किंवा नाही असा निर्णय लवकरच होणे अपेक्षित आहे. असे. मंत्री भारती पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.