नाशिक विभागातील करोनाची खबरबात एका क्लिकवर वर...

नाशिक विभागातील करोनाची खबरबात एका क्लिकवर वर...

नाशिक | Nashik

महाराष्ट्रासह (Maharashtra) नाशकात (Covid) करोनाने थैमान घातले होते. नाशिक विभागातील (Nashik Division) सर्वच जिल्ह्यात करोनाची बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, उत्तम नियोजनातून विभागातून आजपर्यंत 9 लाख 21 हजार 537 रुग्णांपैकी 8 लाख 97 हजार 309 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे...

सद्यस्थितीत 5 हजार 443 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात 18 हजार 779 रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के आहे, तर मृत्युदर 2.03 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ (Dr P D Gandal) यांनी दिली.

नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 52 लाख 72 हजार 600 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 9 लाख 21 हजार 537 अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. गंडाळ यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.53 टक्के (Nashik District Covid Situation)

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 01 हजार 689 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 91 हजार 775 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 1 हजार 428 रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.53 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 486 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.11 टक्के आहे .

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.57 टक्के (Ahmednagar District Covid Situation)

अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 2 लाख 91 हजार 219 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 2 लाख 81 हजार 238 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 3 हजार 881 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.57 टक्के इतका आहे. आजपर्यंत 6 हजार 100 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.09 टक्के आहे.

धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.51 टक्के (Dhule District Covid Situation)

धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 45 हजार 782 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 45 हजार 103 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 11 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.51 टक्के इतके आहे. आजपर्यंत 668 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.45 टक्के आहे.

जळगांव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के (Jalgaon District Covid Situation)

जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 548 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 1 लाख 39 हजार 867 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 104 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के इतका आहे. आजपर्यंत 2 हजार 575 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.80 टक्के आहे.

नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.58 टक्के (Nandurbar District Covid Situation)

नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 40 हजार 299 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 39 हजार 326 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 19 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.58 टक्के इतके आहे. आजपर्यंत 950 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.35 टक्के आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com