
नाशिक | विजय गिते Nashik
नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील ( (NDST) भ्रष्टाचाराच्या विरोधात, आज गुरुवार दिनांक 4/8/2022 रोजी, दुपारी बारा ते दोन या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
संचालक मंडळाच्या मागील सहा वर्षाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करण्यात यावे, व संस्थेवर तात्काळ प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाची संचालकांनी हडप केलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करून ती कर्मचाऱ्यांना देण्यात यावी,
मुदत संपल्यानंतर अधिकार नसताना संचालक मंडळाने केलेली बेकायदेशीर नोकर भरती रद्द करण्यात यावी, सहा वर्षाच्या काळातील संपूर्ण आर्थिक व्यवहारांची भ्रष्टाचाराची चौकशी करून संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करून कायद्यातील तरतुदी प्रमाणे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.अशा मागण्या आहेत
म्हणून आज जिल्हा टी डीएफ चे अध्यक्ष आर.डी. निकम,मनसेचे शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रकाश सोनवणे रघुनाथ हळदे एस.पी खैरनार, आशिष पवार, सचिन देशमुख, आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.