
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्ह्याने Nashik District निर्धारित कालावधीच्या आत विकास आराखड्याचे village development plan कामकाज पूर्ण केले. गावाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपला विकास आराखडा तयार करून अपलोड केला असून, जिल्हा गाव विकास आराखड्यात राज्यात दुसर्या क्रमांकाचा ठरला आहे.
पंधराव्या वित्त आयोगांतर्गत गावाच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना निधी प्राप्त होत असतो. या निधीतून गाव विकासाची कोणती कामे प्राधान्याने घ्यावी, यासाठी गाव विकास आराखडा तयार केला जातो. आतापर्यंत जिल्ह्यातील 1,384 ग्रामपंचायतींनी आपला विकास आराखडा अपलोड केला आहे.
मागील आठवड्यापर्यंत 233 ग्रामपंचायतींचा आराखडा प्रलंबित होता. या ग्रामपंचायतींनीदेखील वेळेच्या अगोदरच कामकाज पूर्ण केले आहे. राज्यभरातून गाव विकास आराखडा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू होती. यात नाशिक जिल्हा दुसर्या क्रमांकावर राहिला आहे.
नाशिक जिल्ह्यात निफाड 118, दिंडोरी 121, सिन्नर 114, नांदगाव 88, इगतपुरी 96, नाशिक 66 पेठ 73, देवळा 41, मालेगाव 125, कळवण 86, बागलाण 139, येवला 89, चांदवड 90,सुरगाणा 61, त्र्यंबकेश्वर 84 याप्रमाणे ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींनी गावांचा सन 2022-23 साठीचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.