शिवभोजन थाळी वितरणात नाशिक जिल्हा नंबर वन

शिवभोजन थाळी वितरणात नाशिक जिल्हा नंबर वन

नाशिक | Nashik

राज्य शासनाने (State Government) सुरू केलेल्या शिवभोजन थाळीच्या (Shivbhojan Thali) लाभार्थ्यांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) रोज सोळा हजार ९२५ शिवभजन थाळ्या सध्या वितरित केल्या जात असून, त्यात उत्तर महाराष्ट्रात नाशिक (Nashik) जिल्हा अव्वल आहे....

गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या शिवभोजन थाळीचा (Shivbhojan Thali) सामान्यांना फायदा होत आहे. वरण, भात, भाजी, पोळी असा परिपूर्ण सात्त्विक आहार असणारी ही शिवभोजन थाळी खाल्ल्यावर गरिबांची पोटाची भूक भागत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये (Nashik District) सध्या पंधरा तालुक्यांत १३८ शिवभोजन थाळी केंद्र (Shivbhojan Thali Center) असून, त्या माध्यमातून सात हजार थाळ्या वितरित केल्या जातात. तर नाशिक विभागातील (Nashik Division) पाचही जिल्ह्यांत सोळा हजार ९२५ थाळींचे वितरण होते.

शिवभोजन थाळीचा सुरवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे थाळीच्या वितरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

उत्तर महाराष्ट्राची स्थिती नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांत मिळून सध्या रोज १६ हजार ९२५ शिवभोजन थाळी वितरित होत आहेत. नाशिक जिल्ह्यात सात हजार शिवभोजन थाळी वितरित होत आहेत. तर नगर जिल्ह्यात २८ केंद्रांमधून तीन हजार ५००, जळगाव जिल्ह्यात ३८ केंद्रांद्वारे तीन हजार ४२५, धुळे जिल्ह्यात १५ केंद्रांद्वारे एक हजार ५००, तर नंदुरबार जिल्ह्यात १२ केंद्रांमधून रोज एक हजार ५०० शिवभोजन थाळ्या वितरित होत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com