धक्कादायक! जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिकेची आत्महत्या

धक्कादायक! जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिकेची आत्महत्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा रुग्णालयातील (Civil Hospital) अतिदक्षता विभागात (ICU) कार्यरत असलेल्या परिचारिकेने (Nurse) घरी गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. तारवालानगर (Tarwalanagar) परिसरात हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे...

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, शीतल अरविंद सरोदे (Shital Arvind Sarode) (३८, रा. गोकुळ सोसायटी, तारवालानगर, दिंडोरी रोड) यांनी राहत्या घरी पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. त्यांच्या भावाच्या लक्षात हा प्रकार आला. सिव्हिलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सरोदे जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात कार्यरत होत्या. मागील वर्षी त्यांची मालेगावला बदली झाली होती. मात्र त्या तेथे हजर झाल्या नव्हत्या. बदलीसाठी त्या प्रयत्नशील होत्या. बदली न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच सहकारी परिचारिकांनी रुग्णालयात धाव घेतली. परिचारिकेच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com