नुकसानग्रस्तांसाठी नाशिकला मिळाला 'इतका' निधी

पिकांचे झालेले नुकसान
पिकांचे झालेले नुकसान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्यात नाशिकसह (Nashik) काही जिल्ह्यात जून ते ऑगस्ट व सप्टेंबर, २०२२ या कालावधीत झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी (Fund) वितरण शासन निर्णयानुसार करण्यात आले आहे...

नाशिक जिल्ह्याला जून, जुलै २०२२ मधील झालेल्या नुकसानीसाठी रू. २५ लाख ४९ हजार, ऑगस्ट सप्प्टेंबर २०२२ मधील नुकसानीसाठी रू. २३ लाख असा जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी एकूण रू. ४८ लाख ४९ हजार निधी जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आला आहे.

सिन्नर (Sinnar) येथे झालेल्या अतिवृष्टीनंतर (Heavy Rian) राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून तात्काळ पंचनाम्यासह मदतीसाठी शासनस्तरावर यासाठी पाठपुरावा केला होता.

राज्यात जून व जुलै, २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे नाशिकसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतीपिकाचे व मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

जून व जुलै, २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार निधी वितरीत करण्यात आला आहे.

जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीमध्ये झालेल्या व होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता शासन ११ ऑगस्ट २०२१ अन्वये विहित करण्यात आलेल्या मदतीच्या वाढीव दराने मदत अनुज्ञेय करण्यात आल्याने वाढीव दराने मदत देणे आवश्यक आहे.

तसेच ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२२ या कालावधीत झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीचे प्रस्ताव संबंधित विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाल्यानुसार देण्यात आलेल्या निधीमध्ये वाढीव दराने व ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२२ या कालावधीतसाठीही झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

यात मृत जनावरांसाठी मदत, पुर्णत: नष्ट,अंशत: पडझड झालेली कच्ची, पक्की घरे, झोपडी, गोठे यासारख्या नुकसानीसाठी मदत व इतर अनुज्ञेय असलेला बाबींच्या नुकसानीकरिता बाधितांना राज्य वाढीव दराने मदतीचे वाटप करण्याकरिता या शासन निर्णयान्वये ७ कोटी २४ लाख ६६ हजार तसेच ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२२ या कालावधीत मालमत्तेच्या नुकसानीकरिता २० कोटी ६९ लाख १८ हजार असा एकूण रुपये २७ कोटी ९३ लाख ८४ हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत राज्यातील विविध अतिवृष्टी ग्रस्त संबंधित जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाने मंजूरी देण्यात आली आहे.

पिकांचे झालेले नुकसान
झाडावर झुंज करणारे बिबटे आता पोहोचले छतावर

त्यात नाशिक जिल्ह्याला जून, जुलै २०२२ मधील झालेल्या नुकसानीसाठी रू. २५ लाख ४९ हजार, ऑगस्ट सप्प्टेंबर २०२२ मधील नुकसानीसाठी रू. २३ लाख असा जून ते सप्टेंबर या कालावधीसाठी एकूण रू. ४८ लाख ४९ हजार निधी वितरित करण्यात आला आहे.

या मंजूर निधीमध्ये मुख्यत्वे ज्या घरांची पडझड झाली आहे किंवा ज्या पात्र घरांमध्ये दुकानांमध्ये सामानाची नासधूस झाली आहे याचा मुख्यत्वे समावेश आहे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्याचे व वेळोवळी या संदर्भात निर्गमित शासन निर्णयातील सर्व अटी व शर्तीचे पालन करण्यात यावे, असे निर्देश या शासन निर्णयानुसार देण्यात आले आहेत.

पिकांचे झालेले नुकसान
अरेच्चा! पूल वाहून गेल्याने शेतमाल वाहतुकीसाठी केला 'असा' जुगाड, 'पाहा' व्हिडीओ

सद्यस्थितीत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या होत असलेल्या नुकसानींचेही तातडीने पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याची प्रक्रिया प्रशासनामार्फत सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com