नाशकात हुक्का पार्लरवर छापा; मोठे हॉटेल्स रडारवर

नाशकात हुक्का पार्लरवर छापा; मोठे हॉटेल्स रडारवर
प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आनंदवलीपासून (anandwalli) पुढे असलेल्या चांदशीतील (Chandshi) एका हुक्का पार्लरवर (Hukka Parlor) पाेलिस उपमहानिरीक्षकांच्या (DIG raid at hukka parlor nashik) पथकाने छापा टाकत कारवाई केली. यावेळी २४ हुक्का ओढणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. याप्रकरणी पाच जणांना अटक केली असून कारवाईत ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे......

या कारवाईमुळे शहरालगत असलेल्या मोठ मोठ्या हॉटेल्सचे धाबे दणाणले आहे. हुक्का पार्लरचा मालक संशयित शिवराज नितीन वावरे (27, रा. गंगापूर रोड, नाशिक), कॅशियर विकास विजय उबाळे (25, रा. बुलढाणा), हुक्का पाॅट तयार करणारे रमाकांत नाथ केशव नाथ (36 रा. ओडिसा), गोविंद रामचंद्र मलिक (21, रा. पातेपूर, ओडिसा) व अक्षय चौधरी (20, रा. ओडिसा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

शनिवारी (दि. 25) रोजी रात्री नाशिक परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर(Dr B G Shekhar Dig Nashik) यांना चांदशी येथे हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यानुसार त्यांनी पथक तयार करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर चांदशी शिवारातील शाक मल्टी क्युझिन हॉटेल येथे विनापरवाना सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकला.

या कारवाईत हुक्का ओढणारे २४ जण पाेलिसांनी ताब्यात घेतले. तसेच १८ तंबाखूयुक्त फ्लेवरचे डब्बे, १७ हुक्का पॉट, इतर साहित्य व चार हजार ३५० रुपये असा एकूण ३६ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत नाशिक तालुका पाेलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध सिगारेट व तंबाखू उत्पादने अधिनियम तसेच भादवि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com