दसककर गुरुजी अनंतात विलीन

दसककर गुरुजी अनंतात विलीन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक मधील जेष्ठ संगीत शिक्षक तसेच वादक म्हणून ख्याती असलेले पंडित प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर (94 ) (Senior music teacher pandit prabhakar govindshasri dasakkar) अनंतात विलीन झाले. (Passes Away) इंदिरानगर येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले होते. गोदातीरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले....

दसककर गुरुजींनी अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे ज्ञान दिले. नाशिकमधील महिलांचे पहिले भजनी मंडळ (First woman bhajani mandal) सुरू केले. हजारो विद्यार्थी घडवले. नाशिककरांमध्ये संगीताची आस्था निर्माण करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होत अशा भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.

गुरुजींच्या जाण्याने संगीत क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली प्रसंगी सांगितले.

यावेळी पं.अविराज तायडे, मकरंद हिंगणे, नितीन वारे, नितीन पवार, प्रशांत महाबळ, मोहन उपासनी, आर्कि. संजय पाटील, सुनील देशपांडे, विवेक गरुड, गिरीश पांडे, सुरेश कपाडिया, आनंद ढाकीफळे, प्रमोद पुराणिक, लोकेश शेवडे, मिलिंद गांधी, रमेश देशमुख, ज्ञानेश्वर कासार, आशिष रानडे, गौरव तांबे, डॉ. कुणाल गुप्ते, ऋतुराज पांडे आदींसह संगीत, सामाजिक, उद्योग व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com