खेलो इंडियात नाशिकचा डंका

News Update | न्यूज अपडेट
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

नाशिक । Nashik

हरियाणातील (Haryana) पंचकुला (Panchkula) येथे चौथ्या खेलो इंडिया खो - खो स्पर्धेत ( (khelo india Kho - Kho competition) महाराष्ट्राच्या मुले आणि मुली दोन्ही संघांनी विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राच्या या कामगिरीत नाशिकच्या चंदू चावरे, वृषाली भोये (Chandu Chawre & Vrushali Bhoye) आणि कौसल्या पवार (Kausalya Pawar) यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले. गतविजेत्या महाराष्ट्राच्या कुमार संघाने डावाच्या फरकाने ओदिशावर मात केली. या संघात तिसरी खेलो इंडिया स्पर्धा खेळणारा चंदू चावरे याचा सहभाग होता...

मुलींच्या संघानेही ओदिशाचा (Odisha) काही सेकंदाच्या फरकाने पराभव करून आपले विजेतेपद कायम राखले. गतवर्षी ओदिशा येथे झालेल्या कुमार गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत (Kumar Group National Championship) ओदिशाच्या मुलींनी महाराष्ट्राला तिसऱ्या डावापर्यंत झुंज दिली होती. त्यची पुनरावृत्ती या स्पर्धेत बघायला मिळाली. परंतु आपल्या कडव्या झुंजीचे रूपांतर विजयात करणे त्यांना जमले नाही.

अंतिम सामन्यात पहिल्या पाच गड्यांपैकी चार गड़ी वृषाली भोयेने बाद केल्याने सामन्याच्या पूर्वाधांत महाराष्ट्राला (Maharashtra) दोन गुणांची आघाडी मिळाली.तीच अखेर निर्णायक ठरली. रंगलेल्या सामन्यात प्रत्येक डावात कौसल्या पवारने सरासरी १.४० सेकंदाचे संरक्षण करतांना आक्रमणात दोन गडी बाद करून महाराष्ट्राच्या निसटत्या विजयात मोलाचा वाटा उचलला सलग दुसऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रा तर्फे राष्ट्रीय खो - खो स्पर्धेत मितभाषी वृषालीने सर्वाधिक गडी बाद करून महाराष्ट्राच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.

खेलो इंडिया खो - खो स्पर्धेत वृषालीने १५ गडी बाद केले. पाच सामन्यात चार वेळा सरंक्षण करणाऱ्या कौसल्याने एकूण ७.२० सेकंद पळतीचा खेळ करतांना आक्रमणात पाच गडी टिपले. जुन महिन्यात पाचव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या भारतातील एखाद्या संघटनेमार्फत लोक सहभागातून चालविण्यात येणाऱ्या खो खो प्रबोधिनीतील वृषाली आणि कौसल्या यांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

खेलो इंडिया खो- खो स्पर्धेत सहभागी होणाऱ्या त्या नाशिकच्या पहिल्या महिला खेळाडू (Female players) आहेत.वृषाली आणि कौसल्या यांना जिल्हा खो खो संघटनेचे पाठबळ असून जिल्हा क्रीडा कार्यालय (District Sports Office) संचलित शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सराव करत असतात. त्या नाशिकच्या खेळाडू असून उमेश आटवणे, गीतांजली सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळ, सायंकाळ नियमित सराव करतात. जून महिन्यात पाचव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या खो - खो प्रबोधिनीच्या यशात त्यांच्या या सोनेरी यशामुळे मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या खेळाडूंचा सत्कार ज्येष्ठ खो खो खेळाडू तथा नाशिक जिल्हा संघटनेचे आजीवन अध्यक्ष रमेश भोसले कार्याध्यक्ष आनंद गारमपल्ली, उपाध्यक्ष रोहिणी ढवळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे करण्यात आला. त्यांना आवर्त बँकेतर्फे बक्षिस देण्यात आले. नाशिक जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे, संघटनेचे खजिनदार सुनील गायकवाड यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com