नाशिक : झाडाची फांदी कोसळून वाहनांचे मोठे नुकसान

नाशिक : झाडाची फांदी कोसळून वाहनांचे मोठे नुकसान

जुने नाशिक | प्रतिनिधी | nashik

येथील चौक मंडई भागातील हजरत इमाम शाह बाबा रोडवरील चिंचेच्या झाडाची मोठी फांदी कोसळल्याने खाली उभे असलेल्या दोन रिक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इतर वाहनांचे देखील नुकसान झाले आहे....

परिसरातील नागरिकांसह व्यवसायिकांनी त्वरित बचाव कार्य सुरू केल्याने मोठा अनर्थ टाळला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी परिश्रम करीत फांद्या हटवून मार्ग मोकळा केला.

ही घटना आज (दि.13) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास जहांगीर मशीद कब्रस्तान जवळ घडली. कब्रस्तान भिंती लगत असलेल्या चिंचेच्या झाडाची फांदी कोसळली, त्यात कब्रस्तान बाहेर दुरुस्ती कामासाठी आलेल्या दोन ऑटोरिक्षाचे नुकसान झाले आहे. त्यात आसिफ शेख हनीफ यांच्या (एमएच १५ ईएच ०९४६) रिक्षाचे हूड व अस्तरचे तर हैदर सय्यद यांच्या (एमएच १५ ईएच १६६१) रिक्षाचे समोरची काचसह इतर नुकसान झाले आहे.

दोन्ही वाहनांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अचानक फांदी कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती तसेच रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.

नाशिक : झाडाची फांदी कोसळून वाहनांचे मोठे नुकसान
भीषण अपघात! टॉवर वॅगन ट्रेनच्या धडकेत चार कर्मचारी ठार

जुने नाशिकमधून शेकडो विद्यार्थी याच रस्त्याने नॅशनल उर्दू शाळेत येत व जात असतात. हि घटना शाळा भरण्याची व सुटण्याच्या वेळीस झाली नाही म्हणून नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नाशिक : झाडाची फांदी कोसळून वाहनांचे मोठे नुकसान
करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजना आमुलाग्र बदल घडवणारी - मुख्यमंत्री

फांदी कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या शिंगाडा तलाव फायर स्टेशनमधील लिडिंग फायरमन संजय घोडे, फायरमन इसहाक शेख व रमेश घांगळा, वाहन चालक नाजीम देशमुख देवदूत वाहन घेत घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांसोबत समवेत स्थानिक दुकानधारकांनी मिळून काही मिनिटातच झाड रस्त्याचा बाजूला केले व रस्ता मोकळा केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com