रक्तदान शिबिरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महाराष्ट्र दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम

रक्तदान शिबिरात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 
महाराष्ट्र दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र दिन सामाजिक बांधिलकी जपून साजरा करावा या अनुषंगाने आज नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन व जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर अनंत कान्हेरे मैदान येथील योगा हॉलमध्ये आयोजित करण्यात आले....

सकाळी आठ ते दुपारी एक या वेळेत हे शिबिर उत्साहात राबवण्यात आले. 124 सायकलिस्टने रक्तदान केले. विशेष म्हणजे वीस महिला सायकलिस्टनी रक्तदान केले.

करोना महामारीच्या काळात फारसे रक्तदाते पुढे येत नव्हते. प्रचंड तुटवडा रक्तपेढीमध्ये जाणवत होता तसेच थॅलेसेमिया सिकल सेल ॲनिमिया, गरोदर माता यांना वेळोवेळी रक्ताची गरज भासत असते. मेट्रो रक्तपेढी, जिल्हा शासकीय रुग्णालय ,नाशिक येथे गोरगरीब जनतेला सेवा दिली जाते.

याकरिता नशिक सायकलिस्टस फाऊंडेशनने योगदान देण्याचे ठरविले. या शिबिरासाठी मार्गदर्शन नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखडे, उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, किशोर माने व सचिव डॉ. मनिषा रौंदळ, खजिनदार रवींद्र दुसाने यांचे लाभले.

हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयोजन व नियोजन प्रशांत भागवत व संजय पवार यांनी योग्यरीत्या केले. विशेष परिश्रम नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनचे पदाधिकारी राजेश्वर सूर्यवंशी, मोहन देसाई, माधुरी गडाख, दविंदर भेला, यशवंत मुधोळकर, प्रवीण कोकाटे, जाकिर पठाण, सुरेश डोंगरे, जगन्नाथ पवार ,किशोर काळे, गणेश कळमकर, सचिन नरोटे यांनी केले.गौरी सामाजिक कल्याणकारी सस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रोहिणी नायडू यांनी या शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

जिल्हा शासकीय रुग्णालयाचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शिवाजी लहाडे ,सिस्टर किरण वैष्णव, टेक्निशियन प्रतिभा ढिकले, ज्योती बर्वे व मेट्रो रक्तपेढी टीमने विशेष परिश्रम घेतले.

आज केलेल्या रक्त साठ्याचा प्रतिक्षेत असणाऱ्या रूग्णांसाठी विशेष लाभ होईल असे मत रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. लहाडे यांनी व्यक्त केले.

जिल्हा शासकीय रुग्णालय मैट्रो रक्तपेढी नाशिक तर्फे प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र देण्यात आले .नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन सदस्य रक्तदानासाठी मोठ्या उत्साहाने स्वतःहून पुढे येतात , कौतुकाची थाप म्हणून अध्यक्ष वानखेडे सर यांच्या तर्फे प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देण्यात आली.

तसेच या शिबिरामध्ये भारतीय भूलतज्ञ संघटना महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या वतीने प्रत्येक सायकलिस्टस जीवन रक्षक व्हावा या साठी जीवन संजीवनी प्रक्रियेचे प्रात्यक्षिक रक्तदान शिबिरादरम्यान देण्यात आले. यासाठी भारतीय भुल संघटनेचे अध्यक्ष डॉ. निलेश ततार, भुलतज्ञ डॉ. हीतेंद्र महाजन, डॉ.अनिता नेहेते यांनी मार्गदर्शन केले.

Related Stories

No stories found.