5G सेवा : फसवणुकीसंदर्भात सायबर पोलीस ठाण्यातर्फे मार्गदर्शनपर सूचना जारी

5G सेवा : फसवणुकीसंदर्भात सायबर पोलीस ठाण्यातर्फे मार्गदर्शनपर सूचना जारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

४ जी (4 G) पेक्षा अधिक वेगवान व इतरही अनेक सुविधा देणारी ५ जीच्या (5 G) सेवेच भारतात उदघाटन झाले आहे. सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) भविष्यात ५ जी च्या नावाने विविध प्रकारच्या शक्कल लढवून फसवणुक (Fraud) करण्याची दाट शक्यता असल्याने नाशिक सायबर पोलीस ठाण्याच्या (Nashik Cyber Police Station) वतीने मार्गदर्शनपर सूचना जारी करण्यात आल्या आहेत...

प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये ५ जी प्रणाली अपग्रेड करण्यासाठी आतुर राहणार असून हे ओळखून सायबर गुन्हेगार ५ जी सिमकार्ड / मोबाईल अपडेट करण्याचा बहाणा करून आपली संपूर्ण माहीती भरा, बँक डिटेल भरा, फी भरा, केवायसी अपडेट करा असा फसवणुकीचा नवा प्रकार करण्याची शक्यता आहे.

तसेच लिंकवर क्लीक करून तुम्हाला आमचे फोन गॅलरीमध्ये किंवा ऑफिसला येण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसुनच अपग्रेड करू शकता, अशा भुलथापा देऊन फसवणूक होण्याची शक्यता आहे. या संदर्भात नाशिकमध्ये (Nashik) कुठलीही तक्रार अद्याप दाखल झाली नसली तरी अशा होणा-या फसवणुकीच्या प्रकारापासून वाचण्यासाठी नागरिकांनी दक्षता व काळजी कशी घ्यावी हे परिपत्रकाद्वारे नाशिक सायबर पोलीस ठाण्याने सांगितले आहे.

दरम्यान, नागरिकानी ५ जी सिमकार्ड अपग्रेड फसवणुकीस बळी न पडण्याचे आवाहन सायबर क्राईम पोलीस ठाणे, नाशिक शहर यांच्या मार्फत करण्यात आले आहे. तसेच अशा फसवणुकीस कुणी बळी पडल्यास 'नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल' वर ऑनलाईन तक्रार (Complaint) करावी किंवा सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

काळजी व दक्षता कशी घ्यावी

१) सिमकार्ड मान्यताप्राप्त सर्व्हिस सेंटर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या गॅलरीत स्वत: जाऊनच ५ जी प्रणाली बाबतचे सिमकार्ड अपग्रेड करणे सर्वात सुरक्षित राहील.

२) मोबाईल वर ५ जी सिमकार्ड प्रणाली साठी येणारी कोणतीही अनधिकृत लिंक ओपन करू नये.

३) टिमव्हीवर , एनीडेस्क यासारखे स्क्रिन शेअरिंग अॅप डाउनलोड करू नये.

४) कोणत्याही अनधिकृत अॅपमध्ये आपले बँक डिटेल्स भरू नये किंवा आपल्या खात्याची माहीती देउ नये.

५) आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी अनोळखी व्यक्तीस शेअर करू नये.

६) क्युआर कोड हा पैसे देण्यासाठी असतो, पैसे घेण्यासाठी नसतो. अनोळखी व्यक्तीकडून पाठविण्यात आलेला क्युआर कोड स्कॅन करू नये.

७) अनाधिकृत अॅप मध्ये आपली माहीती किंवा बैंक डिटेल्स भरू नये.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com