नाशिकरोड नोटप्रेस येथून पाच लाख रुपये गायब

नाशिकरोड नोटप्रेस येथून पाच लाख रुपये गायब
USER

नाशिक । Nashik

नाशिकरोड (Nashikroad) येथील करन्सी नोट प्रेस (Currency Note Press) मधून तब्बल पाच लाख रुपये गायब झाले आहेत. करन्सी नोट प्रेसमध्ये अत्यंत कडेकोट बंदोबस्तात नोटछपाई (Note printing) सुरु असते. असे असतानाही इतकी मोठी रक्कम गायब झाल्याचा प्रकार पुढे आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दरम्यान या सर्व प्रकाराने नोट प्रेस प्रशासनाचे धाबे दणाणले असून या सर्व प्रकाराबाबत लवकरच पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार, 500 रुपये मूल्य असलेल्या नोटांचे 10 बंडल गायब झाल्याचे समजते. हे बंडल गायब झाले आहेत की, प्रशासनाच्याच नजरचुकीने इतर ठिकाणी गेले आहे, याबाबत सध्या शोध सुरु असल्याचे समजते.

दरम्यान, संबंधित प्रकार दोन आठवड्यापूर्वी उघडकीस आला होता. याबबत पोलिसांमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही. करन्सी नोट प्रेस प्रशासन या प्रकाराची विभागांतर्गत गोपनीय चौकशी करत असल्याची चर्चा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com