अवकाळी पावसाने ४५५ हेक्टरवरील पिकांचे नूकसान

अवकाळी पावसाने ४५५ हेक्टरवरील पिकांचे नूकसान
पिकांचे झालेले नुकसान

नाशिक । प्रतिनिधी

अवकाळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यात गेल्या २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत शेतकर्‍यांचे मोठे नुकसान केले आहे. जिल्ह्यातील ५४ गावांमधील सुमारे ४५५ हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत. तब्बल १ हजार २२४ शेतकर्‍यांना फटका बसला असून नूकसानीचे पंचनामे शासनाला पाठविण्यात आले आहे...

मागील दोन वर्षांपासून अवकाळी पाऊस व गारपिटिने जिल्ह्यातिल शेतकर्‍यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. यंदाच्या अवकाळी पावसाने कांदा तसेच आंबा या फळ पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पालेभाज्यांनाही फटका बसला आहे.

सुमारे ४५५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.सटाणा आणि कळवण तालुक्याला याचा सर्वाधिक फटका बसला. नांदगाव, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, येवला या तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण अत्यल्प आहे.

या अवकाळी पावसामुळे ३०२ हेक्टरवरील कांदा पीकाचे तसेच बाजरी, मिरची तसेच भाजीपाल्याचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वार्षिक फळपीकांमध्ये आंबा पीकाचे नुकसान झाले. ४० हेक्टरवरील आंबा पीकाला याचा फटका बसल्याचे अहवालाद नमूद करण्यात आले आहे.

एकुण ४५५.३३ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सटाणा, नांदगाव तसेच कळवण तालुक्याला अवकाळी फटका बसला आहे. त्र्यंबकेश्वर तसेच इगतपुरी तालुक्यातील शेतकºयांना देखील नुकसान सहन करावे लागले आहे.

कळवण तालुक्यातील २२१, नांदगावातील ९६, कळवणमधील २८८, त्र्यंबकेश्वरमधील १२५, इगतपुरीतील २४४ तसेच येवला तालुक्यातील २४३ शेतकºयांना या नुकसानीचा फटका बसला आहे. बागायती क्षेत्रावरील सुमेरे ४१५ तर वार्षिक फळपीके क्षेत्रावरील ४० असे एकुण ४५५ हेक्टवरील पीकांचे नुकसान झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com