'ये पिल्लू' नावाने केला घात; प्रवाशाची लुट करणाऱ्यांना पोलिसांकडून बेड्या

'ये पिल्लू' नावाने केला घात; प्रवाशाची लुट करणाऱ्यांना पोलिसांकडून बेड्या

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

तामिळनाडू (Tamilnadu) येथून आलेल्या एका प्रवाशाला मारहाण करून त्याच्या जवळील मोबाईल व इतर साहित्य असा सुमारे तीस हजार रुपये पाचशे रुपयांचा ऐवज लुटून येणाऱ्या दोघा जणांना नाशिक रोड पोलिसांनी (Nashikroad Police) शिताफीने अटक केली आहे....

तिलक तिरूमणी (रा तामिळनाडू) प्रवासी दोन दिवसापूर्वी नाशिकरोड येथे आला होता. त्यानंतर तो एका रिक्षात बसला असताना रिक्षा चालक व त्याच्या साथीदारां ने सदरची रिक्षा मुक्तीधाम रस्त्यावर नेली व त्या ठिकाणी तिरू मनी यास मारहाण करून लूटमार केली.

त्याच्या जवळील पंधरा हजार रुपयेचा मोबाईल पंधरा हजार रुपयाचे मशिनरी टेस्टिंग कंट्रोल (Machinery testing control) व 500 रुपये रो क असा ऐवज लुटून नेला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, या घटनेनंतर तिरूमनी त्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Complaint Registered at Nashikroad Police Station) तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराने आरोपीचे वर्णन व रिक्षा नंबर दिला होता. तसे रिक्षावर ये पिल्लू व महाकाली असे नाव असल्याची माहिती नाशिक रोड पोलिसांना मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या तीन टीम बनविण्यात आल्या.

त्यापैकी एक टीम शालीमार द्वारका व सीबीएस दुसरी टीम नाशिक रोड रेल्वे टेशन वर बिटको चौक व जेलरोड व तिसरी टीम पंचवटी गोदावरी नदी परिसरात शोध घेत होती.

परंतु पोलिसांना या ठिकाणी काही मिळून आले नाही त्यानंतर सदरची रिक्षा देवळाली कॅम्प भगूर परिसरातली असल्याचे समजल्यानंतर पोलिसांचे पथक भगूर परिसरात असलेल्या ठिकाणी गेले त्यानंतर त्यांनी भगवा चौक पंपिंग स्टेशन या ठिकाणी शोध घेतला असता सदरची रिक्षा पोलिसांना आढळून आली.

तसेच रिक्षा मध्ये असलेले दोन संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले असता त्यांची नावे स्वप्निल देविदास चव्हाण 25 राहणार बागुल नगर विहितगाव नाशिक रोड व साजिद शाहू शेख 24 राहणार भगूर बसस्थानकाजवळ असे असल्याचे आढळले.

त्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून लुटमार केलेला मुद्देमाल तसेच कंपनीचे सॉफ्टवेअर पार्ट मोबाईल फोन टूल किट ऑटो रिक्षा असा सुमारे एक लाख तीस हजार रुपयांचा आईवर जप्त केला. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com