हातचलाखीने एटीएम बदलत वृद्धांच्या खात्यातून काढायचा पैसे

इंदिरानगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हातचलाखीने एटीएम बदलत वृद्धांच्या खात्यातून काढायचा पैसे

इंदिरानगर | वार्ताहर

ज्येष्ठ नागरिकांचे ए.टी.एम. कार्ड हातचालाखीने बदलुन त्यांचा ए. टी. एम. पिन नं. टाकून त्यांच्या खात्यावरील पैसे लंपास करणाऱ्या एका संशयिताला इंदिरानगर पोलिसांनी अटक केली...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शैलेश प्रदिप शिंदेगे (वय २१ वर्षे, रा. करूणासागर रोहाउस श्रमिकनगर सातपुर) हा काल दुपारी तिन वाजेच्या सुमारास बापू बंगला येथील स्टेट बँकेच्या एटीएम समोर संशयित रीत्या फिरत होता.

ही बाब स्टेट बँकेचे मॅनेजर यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित इंदिरानगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले.

त्यानंतर सापळा रचून संशयित आरोपी शैलेश शिंदेगे यास ताब्यात घेतले त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने यापुर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हददीत ए. टी. एम. मध्ये वृद्ध ए.टी.एम. कार्ड हातचालाखीने बदलुन त्यांचा ए. टी. एम. पिन नं. द्वारे त्यांच्या खात्यावरील पैसे काढल्याची कबुली दिली.

यासंदर्भात त्यांच्या विरूध्द पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असुन अटक झाल्याची कबुली दिली. तसेच त्याने भद्रकाली व मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हददीतही गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलीस उपायुक्त विजय खरात, सहा पोलिस आयुक्त सोहेल शेख, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकातील अंमलदार सपोउनि महेश एस.जाधव, मुशरीफ शेख, सागर परदेशी, भगवान शिंदे यांच्या पथकाने केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com