इंदिरानगर | वार्ताहर

सोशल मीडियाद्वारे महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना सोबत घेऊन जाऊन लग्न न करता त्यांचे आर्थिक शारीरिक शोषण करणारा अट्टल गुन्हेगाराला इंदिरानगर पोलिसांनी अटक केली आहे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यापूर्वी इंदिरानगर पोलीस ठाण्यात एका वीस वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार दाखल होती. त्याचा तपास पोलीस करत असताना सदर मुलगी सोशल मीडियाद्वारे ओळख झालेल्या मुलाबरोबर गेल्याचे व सदर मुलगा संशयित आरोपी वैभव लक्ष्मण पाटील (वय 30 रा उघडेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा) हा असल्याचे व त्याच्यावर अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

हा संशयित सोशल मीडियाद्वारे महिलांना जाळ्यात ओढून लग्न करण्याचा भूलथापा देऊन त्यांना घरातून पळून घेऊन जात असे. त्यानंतर लग्न झाले असे भासवत शारीरिक व आर्थिक शोषण करत होता.

या संशयिताच्या शोधात मुरबाड, ठाणे, सातारा, महाड या भागात इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक दोन महिने तपास करत होते.

नुकत्याच प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित पाटील यास मुरबाड येथून हरवलेल्या मुलीसह ताब्यात घेण्यात आले.

त्यास कोर्टात हजर केले असता शनिवार पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. ही कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुवासिनी बरेला पोऊनी प्रवीण बाकले, आहेर ,जावेद खान , खांडेकर यांच्या पथकाने केली.