चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीला जन्मठेप

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीला जन्मठेप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या डोक्यात मुसळीने वार करून खून (murder) केल्याप्रकरणी न्यायालयाने (court) एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे...

अण्णासाहेब निवृत्ती गायखे (annasaheb gaikhe) (५५, रा. शिवराम नगर, जेलरोड) असे या आरोपीचे नाव आहे. अण्णासाहेब गायखे याने १० जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी त्याची पत्नी ज्याेती गायखे (jyoti gaikhe) यांचा खून केला होता.

अजिंक्य अण्णासाहेब गायखे (२३) यांच्या फिर्यादीनुसार, ते १० जानेवारीला सायंकाळी साडेसातच्या सुमारास आई ज्योतिका यांच्यासह टीव्ही पाहत होते. त्यावेळी वडील अण्णासाहेब यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घातला.

तसेच किचनमधून मुसळी आणून त्याने ज्योतिका यांच्या डोक्यावर वार करीत जीवे मारले. आईला वाचवण्यासाठी आलेल्या अजिंक्य व धनश्री या दोघा मुलांवरही अण्णासाहेब गायखेने मुसळीने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (upnagar police station) अण्णासाहेब विराेधात खून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी पक्षातर्फे ॲड. सुलभा सांगळे (adv Sulbha Sangale) यांनी युक्तीवाद केला. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी आरोपीस जन्मठेप व १ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार के. के. गायकवाड, पोलिस शिपाई आर. आर. जाधव, आर. एन. शेख यांनी कामकाज पाहिले.

Related Stories

No stories found.