तक्रार मागे घेण्यासाठी एकावर चाकू हल्ला

सातपूर औद्योगिक वसाहतीतील घटना
तक्रार मागे घेण्यासाठी एकावर चाकू हल्ला

नाशिक | प्रतिनिधी

पोलीसात दिलेली तक्रार मागे घ्यावी या कारणातून कारमधून आलेल्या संशयिताने एकावर चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि.१५) सातपूर औद्योगीक वसाहतीत घडली...

विनोद बर्वे (नाव गाव नाही) असे चाकू हल्ला करणार्‍या संशयित कारचालकाचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर सुरेश गोमासे (२६ रा.इंदिरा शाळेजवळ,कार्बन नाका रोड,शिवाजीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार, गोमासे मंगळवारी शतपावली करीत असतांना ही घटना घडली. सातपूर येथील सगुना चिकन सेंटर समोरून गोमासे जात असतांना स्विफ्ट कारमधून आलेल्या संशयीताने त्यांच्या अंगावर वाहन घातले.

यावेळी कार खाली उतरलेल्या संशयीताने साईलीला बारची केस मागे घे नाहीतर मी तुला जीवंत ठेवणार नाही असे म्हणून गोमासे यांच्या डोक्यावर चाकूने हल्ला केला मात्र गोमासे यांनी वेळीच हात आडवा केल्याने त्यांच्या हातास दुखापत झाली आहे.

याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार भामरे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com