हौसमौस भागवण्यासाठी चोरायचा महागड्या बुलेट

हौसमौस भागवण्यासाठी चोरायचा महागड्या बुलेट

नंदुरबारमधून चोरटा गजाआड, 7 बुलेट, 2 स्प्लेंडर जप्त

नाशिक। प्रतिनिधी

हौस भागवण्यासाठी प्रामुख्याने महागड्या बुलेटच चोरणार्‍या चोरट्यास गुन्हे शाखा एकच्या पथकाने नंदुरबारच्या बसस्थानकातून शिताफिने जेेरबंद केले...

पवन उर्फ विक्की प्रेमचंद पाटील (25, रा.नवागाव , उदना , सुरत, गुजरात. मुळ रा.आव्हानी पाळदी , ता . धारणगाव , जि.जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. यबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त दिपक पांडे यांनी सांगीतले, शहरातून वाहन चोरीचे प्रकार वाढले आहेत.

प्रामुख्याने 11 एप्रिलला भद्रकाली परिसरातून बुलेटची चोरी झाल्याचा गुन्हा घडला होता. यानंतर दुसराही बुलेट चोरीचा गुन्हा घडला याबाबत गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार मुख्तार शेख यांनी ज्या ठिकाणाहुन बुलेट चोरी गेली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून त्याचे बारकाईने निरीक्षण केले.

त्याचे तांत्रीक विश्लेषण करून संशयिताची ओळख पटविण्यत यश मिळविले . तसेच हाचोरटा नंदुरबारयेथे असल्याची तांत्रीक विश्लेषणावरून माहिती अवगत केली. त्यांनी केलेल्या तपासाची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ यांना कळविली.

त्यांनी तातडीने 14 एप्रिलला गुन्हेशाखेचे सहायक निरिक्षक महेश कुलकर्णी, रघुनाथ शेगर, दिनेश खैरनार, उपनिरिक्षक रविंद्र बागुल पोहवा, येवाजी महाले, रावजी मगर, मोतिराम चव्हाण, मुख्तार शेख, राहुल पालखेडे, प्रविण चव्हाण, गणेश वडजे, समाधान पवार यांचे पथक नंदुरबार येथे रवाना केले.या पथकाने मिळालेल्या माहिती प्रमाणे आरोपीचा सतत दोन दिवस शोध घेवुन तपास केला अखेरीस खात्रीशिर मिळालेल्या माहितीच्या आधारे नंदुरबार बसस्टॅन्ड परिसरात संशयीतास शिताफिने ताब्यात घेतले .

त्याने सुरत ( गुजरात ) 4 , धुळे 2, पंचवटी 1 , भद्रकाली 1, मुंबई नाका1, असे एकुण 9 ठिकाणाहून मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिलेली आहे त्याच्याकडून 90 लाख 80 हजार रूपयांच्या 7 बुलेट तर एक लाख रूपये किंमतीच्या दोन स्प्लेंडर गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com