Nashik Crime News : पती-पत्नीकडून एकाची 90 लाखांची फसवणूक

Nashik Crime News : पती-पत्नीकडून एकाची 90 लाखांची फसवणूक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील नाशिकरोड (Nashikroad) भागात राहणार्‍या एका तरुणाची तब्बल 90 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

याप्रकरणी जेम्स प्रसाद वरसाला (वय 36, रा. हरी निवास, आनंदनगर, नाशिकरोड, नाशिक) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांचीच फसवणूक झाली आहे. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पद्माकर घुमरे व त्यांच्या पत्नी सुनीता घुमरे उर्फ सुनिता भंडारे (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Nashik Crime News : पती-पत्नीकडून एकाची 90 लाखांची फसवणूक
Nashik Sinnar News : महामार्गालगतच्या नाल्यात आढळला तरुणाचा मृतदेह; घातपाताचा संशय

या दोघा पती-पत्नी यांनी संगणमत करून जेम्स यांना वाडीवार्‍हे जवळ अकरा एकर जमीन खरेदी करून देतो, असे सांगून विश्वास संपादन केले होते. त्यानुसार त्यांनी वेळोवेळी बँक खात्यातून पैसे काढून घेऊन जमीन खरेदी न देता पैसे स्वतःच्या फायदा करिता वापरून फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2 मे 2014 ते 30 सप्टेंबर 2014 या काळात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील भोसला कॉलेज जवळ एका ऑफिसमध्ये घडला होता.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Crime News : पती-पत्नीकडून एकाची 90 लाखांची फसवणूक
Nashik Road News : नानेगावला बिबट्या जेरबंद; पाहा Video
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com