पाच वर्षापूर्वीपासून खुनातील फरार संशयीत अखेर जेरबंद

पाच वर्षापूर्वीपासून खुनातील फरार संशयीत अखेर जेरबंद

पंचवटी | वार्ताहर

मखमलाबाद रोडवरील क्रांती नगर येथील भेळभत्ता विक्री करणारा सुनील वाघ याचा पाच वर्षापुर्वी खून झाला होता.या प्रकरनातील एक संशयित फरार होता,यास पंचवटी गुन्हे शोध पथकाने अखेर बेड्या ठोकल्या आहे...

मखमलाबाद रोडवरिल क्रांतीनगर परिसरात भेळभत्त्याची गाडी लावून आपला उदरनिर्वाह करणारे हेमंत रामदास वाघ आणि सुनील रामदास वाघ या दोघा सख्या भावांवर २७ मे २०१५ रोजी परदेशी गँगने पूर्ववैमनस्यातून रात्रीच्या दरम्यान प्राणघातक हल्ला केला होता.

यात सुनील वाघ हा मयत झाला होता तर हेमंत वाघ हा गंभीर जखमी झाला होता .या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणात२१ संशयीताना अटक करण्यात आली होती.

तर यातील संशयित रवींद्र दगडु सिंग परदेशी फरार होता, पोलिस आयुक्त दीपक पांड्येय, पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलिस आयुक्त नवलनाथ तांबे यांनी सदर संशयीत आरोपीचा शोध घेण्याकामी आदेशित केले होते.

त्यानुसार, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार यांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने सखोल तपास सुरू केला.

संशयीत रविंद्र दगडु सिंग परदेशी हे दिंडोरी तालुक्यातील मौजे जोरण येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली त्यावर पोलिसांनी सापळा रचून यास ताब्यात घेतले आणि त्याला जेरबंद केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com