
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आडगाव पोलीस ठाणे (Adgaon Police Station) हद्दीतील जेजुरकर मळा टाकळी परिसरात शनिवारी रात्री चार अज्ञात हल्लेखोरांनी एका टायर पंक्चरच्या दुकानात काम करणारा युवक गुलाम रब्बानी याची तीक्ष्ण हत्याराने वार करून जागीच ठार (Murder) केले होती. याप्रकरणी पोलिसांनी चार पथकांद्वारे गुन्हेगारांचा शोध सुरु केला होता...
पोलिसांनी (Police) अवघ्या चार तासातच तीन संशयितांना अटक केली आहे. प्रसाद पवार, यश पवार असे संशयितांचे नाव आहे. तसेच एका विधी संघर्षित बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील जेजुरकर मळा टाकळी परिसरात शनिवार २९ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती चार अज्ञात हल्लेखोरांनी एका टायर पंक्चरच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणावर हत्याराने वार केले. पोटाला आणि डोक्याला मार लागल्याने तो जागीच ठार झाला. यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अवघ्या चार तासांतच संशयितांना जेरबंद केले.