ओळखीचे रुपांतर झाले मैत्रीत, पण मित्रानेच केला दगाफटका; मागितली ९ लाखांची खंडणी

ओळखीचे रुपांतर झाले मैत्रीत, पण मित्रानेच केला दगाफटका; मागितली ९ लाखांची खंडणी

नाशिक | प्रतिनिधी

महिलेशी ओळख वाढवून मैत्रिचा दुरूपयोग करत तीच्या समवेत काढलेले फोटो सोशल माध्यमातून व्हारल केले. तसेच अधिक फोटो व्हायरल न करण्यासाठी ब्लॅकमेल करून ९ लाख रूपयांची खंडणीची मागणी करणार्‍याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

अमोल अनिल माळी (३०, रा. पाथर्डीफाटा, मुळ यावली, ता. मोहळ, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, माळी याने महिलेशी ओळख वाढवत मैत्रि केली. यातून त्याने दोघांचे अश्‍लिल फोटो काढून घेतले.

१२ मे रोजी त्याने काही फोटो फेसबुक तसेच इस्टांग्राम या सोशल माध्यमाद्वारे व्हायरल केले. त्याच्याकडे असलेले अधिक फोटो व व्हीडीओ पुन्हा व्हायरल न करण्यासाठी तसेच प्रकरण मिटवण्यासाठी त्याने महिलेकडे शरिर सुखाची मागणी केली.

तसेच तीच्या दिराकडे ९ लाख रूपयांची मागणी केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खंडणी तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक कुंदन जाधव करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com