फुलविक्रेत्या मावशीच्या अंत्यविधीला पोहोचले पोलीस आयुक्त दीपक पांडेय

फुलविक्रेत्या मावशीच्या अंत्यविधीला पोहोचले पोलीस आयुक्त दीपक पांडेय

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांच्या निवासस्थानाजवळ फुलं विकणाऱ्या एका वयोवृद्ध फुलवाल्या मावशींना कॅन्सरची लागण झाली होती. अशातच त्यांचा मृत्यू झाला. (Flower shopkeeper woman) पोलीस आयुक्त पांडेय दररोज या महिलेकडून फुल विकत घेत असायचे. महिलेच्या निधनानंतर अंत्यविधीला स्वत: पोलीस आयुक्त हजर झाल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे....

सातपूर कोळीवाडा (Satpur Koliwada) येथील रहिवासी जिजाबाई पुराणे यांचा फुलविक्रीचा व्यवसाय आहे. पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांच्या शासकीय निवास्थानाच्या शेजारी हे दुकान आहे. पोलिस आयुक्त पांडे हे नेहमी पूजेसाठी या आजीबाईंकडून फुले विकत घेत होते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिजाबाई या दुकानात फुले विकतांना दिसत नव्हत्या. म्हणून पांडे यांनी दुकानावर जाऊन जिजाबाईंची चौकशी केली.

त्यावेळी जिजाबाईना कॅन्सर झाला असल्याचे समजल्याने आयुक्त पांडे यांनी जिजाबाईंचे घर गाठत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

यावेळी सातपूरचे वपोनी महेंद्र चव्हाण यांना जिजाबाईंची वेळोवळी विचारपूस करावीअसे सांगितले. सोबत दोन डॉक्टरदेखील त्यांच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी पाठवले. तसेच या कुटुंबाला आर्थिक मदतदेखील केली होती.

मात्र जिजाबाई पुराणे यांचे निधन झाले. ही बातमी कळताच पोलिस आयुक्त दिपक पांडे हे जिजाबाईच्या निवासस्थानी दाखल झाले व जिजाबाई यांच्या मुलाच्या पाठिवर हात ठेवत सात्वन केले व त्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com