गँगस्टर रवी पुजारीची कारागृहात रवानगी; काय झालं आज कोर्टात?

गँगस्टर रवी पुजारीची कारागृहात रवानगी; काय झालं आज कोर्टात?

नाशिक | प्रतिनिधी

पाथर्डी फाटा येथे बांधकाम व्यवसायिक कार्यालयावर गोळीबार करून 10 कोटींची खंडणी प्रकरणी कुख्यात गुंड रवी पुजारी याची सहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज पुन्हा न्याल्यात हजर करण्यात आले होते.

त्यास आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्याची पुन्हा आर्थररोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेच्या या प्रकरणातील तपास पूर्ण झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.

पुजारीचे या प्रकरणातील फोन कॉल तपासणीसाठी त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले असून ते तज्ञांकडे रवाना करण्यात आले आहेत.

त्याची करोना चाचणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून यानंतर मुंबईच्या आर्थर रोड कारागृहत रवानगी करण्यात येणार आहे.

कोण आहे रवी पुजारी?

रवी पुजारी मूळचा कर्नाटकातील मालपे (जि. उडपी) येथील असून, 1990 पासून मुंबईत अंडरवर्ल्डमध्ये शार्प शूटर म्हणून काम करत होता. सुरुवातीला गँगस्टर छोटा राजन याच्या टोळीत असलेल्या पुजारीने नंतर स्वतःची टोळी बनविली. नंतर तो खंडणी गोळा करू लागला होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. परदेशात पलायन केल्यानंतर रेड कॉर्नर नोटीसदेखील बजावण्यात आली होती.

हे गुन्हे आहेत दाखल..

रवी पुजारीच्या विरोधात सुमारे 100 च्यावर गुन्हे दाखल आहेत. मुंबई आणि आजूबाजूच्या एमएमआरडीए रिजनमध्ये सुमारे 78 गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबई पोलीस दलात 49 गुन्हे आहेत. तर मोक्काचे 26 गुन्हे आहेत. तसेच इतर राज्यातही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com