नाशकात आज ५ हजार रुग्ण झाले करोनामुक्त

३ हजार ६६१ बाधित रुग्ण वाढले; रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने काहीसा दिलासा
नाशकात आज ५ हजार रुग्ण झाले करोनामुक्त

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात आज ५ हजार रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बाधित रुग्ण वाढीच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे....

नाशिक जिल्ह्यात आज ३ हजर ६६१ रुग्णांची भर पडली. आज वाढलेल्या रुग्णांमध्ये नाशिक मनपा क्षेत्रात १ हजार ९५४, नाशिक ग्रामीणमध्ये १ हजार ६७०, मालेगाव मनपा क्षेत्रात १६ तर जिल्हाबाह्य २१ रुग्णांचा समावेश आहे.

नाशिक महापालिकेत वाढलेल्या रुग्णांच्या बरोबरीतच आता ग्रामीणमधील रुग्णसंख्या वाढू लागली आहे त्यामुळे ग्रामीण भागात वाढलेला करोनाचा शिरकाव कमी करण्याचे आव्हान आता आरोग्य यंत्रणेपुढे आहे.

नाशिक जिल्ह्यात आज तब्बल ३७ रुग्णांनी प्राण गमावले. या वाढलेल्या आकडेवारीमुले आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३ हजर ३८२ रुग्ण करोनाच्या संसर्गाने दगावले आहेत.

आजच्या दगावलेल्या रुग्णांमध्ये नाशिक मनपा क्षेत्रातील १३, नाशिक ग्रामीणमधील २४ रुग्णांचा समावेश आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com