कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सोमबाबू अग्रवाल यांचे निधन

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सोमबाबू अग्रवाल यांचे निधन

नाशिक | Nashik

नाशिकमधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सोमबाबु अग्रवाल (Nashik Congress senior leader) यांचे वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. (Sombabu agrawal passes away)

ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते. अग्रवाल सभा (Agrawal Sabha Nashik) नाशिकचे ते सुमारे २० वर्षे अध्यक्ष राहिले होते. तसेच त्यांनी नाशिक पीपल्स बँकेचे (Nashik Peoples Bank) चेअरमनपद भूषविले होते.

यासोबतच त्यांनी खाद्यपेय विक्रेता संघ अध्यक्षपद, गाइड संस्था (Guide Sanstha President) अध्यक्षपद, नाशिक माजी शिक्षण मंडळ सदस्यपद, नाशिक महानगरपालिका पहीले शिक्षण मंडळ सदस्य, नागरी सेवा समिती अध्यक्षपद, विशेष कार्यकारी अधिकारी तसेच काळाराम मंदिर ट्रस्ट सदस्य या पदांवरून भरीव योगदान त्यांनी दिले.

त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. अग्रवल सभा नाशिकचे विद्यमान अध्यक्ष दिपक अग्रवाल यांचे ते वडील होत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com