मोठी बातमी ! नाशिक पूर्णत: लाॅकडाऊनचा चेंडू मुख्यमंत्र्याच्या कोर्टात

पालकमंत्री भुजबळ : भाजप आमदारंचीही मागणी
मोठी बातमी ! नाशिक पूर्णत: लाॅकडाऊनचा चेंडू मुख्यमंत्र्याच्या कोर्टात

नाशिक । Nashik

जीवनावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक गैरफायदा घेत मोकाट फिरत असून परिस्थिती अतिशय विदारक आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करुन परिस्थितीची कल्पना दिली असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याच्यांकडे नाशिक पूर्णत: लाॅकडाउनची मागणी करणार आहे.

व्यापारी, किराणा दुकानदार यांनी देखील लाॅकडाउनला पाठिंबा दर्शवला असून भाजप आमदारांनीही ही मागणी आपल्याकडे केली आहे. याबाबत अंतिम निर्णय मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील असे स्पष्ट संकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com